MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor साकारणार भूमिका !
MOM 2: प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी आतापर्यंत ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘सिर्फ तुम’, ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘नो एन्ट्री’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. काही महिन्यांपूर्वी ते अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘मैदान’ हा चित्रपट घेऊन आले होते आणि आता बोनी कपूर आपली धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट खुशीची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या शेवटच्या चित्रपट ‘मॉम’चा सिक्वेल असणार आहे. (Mom 2 Announcement)

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाहीत. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. या दु:खद बातमीने सर्वजण स्तब्ध झाले होते . २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मॉम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. आता त्यांचा वारसा तिची मुलगी खुशी कपूर पुढे नेणार आहे. तिचे वडील बोनी कपूर यांनी रविवारी जयपूरमध्ये आयफा २०२५ रौप्यमहोत्सवी समारंभात एक खुलासा केला. त्यांनी ‘मॉम २’ ची घोषणा केली, ज्यात खुशी हिरोईन असणार आहे.

बोनी कपूर यावेळी म्हणाले की, ‘मी खुशीचे ‘आर्चीस’, ‘लव या पाटणा’ आणि ‘नादानियान’ हे सर्व चित्रपट पाहिले आहेत. ‘नो एन्ट्री’नंतर मी तिच्या सोबत एका चित्रपटाची ही योजना आखत आहे. ती ‘मॉम २’ असू शकते. ती आईच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने काम केलेल्या सर्व भाषांमध्ये तिची आई अव्वल स्टार होती. मला आशा आहे की खुशी आणि जान्हवीदेखील त्या स्तरावर यशस्वी होतील.’
===========================
हे देखील वाचा: Kareena Kapoor ने 18 वर्षांनंतर Shahid Kapoor ला मारली मिठी; व्हिडीओ झाला व्हायरल
===========================
‘मॉम‘ या चित्रपटात श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्याचे दिग्दर्शक रवी उदयवार होते. ही कथा एका आईची होती जी आपल्या मुलीसाठी न्याय मागते. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी श्रीदेवी यांना राष्ट्रीय पुरस्कार (मरणोत्तर पुरस्कार) ही मिळाला होता.