Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक

न्यू नॅशनल क्रश अलर्ट! निळ्या साडीतल्या मराठमोळ्या Girija Oak ला

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Lalita Pawar : फाळके पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या ललिता पवार!

 Lalita Pawar : फाळके पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या ललिता पवार!
बात पुरानी बडी सुहानी

Lalita Pawar : फाळके पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या ललिता पवार!

by धनंजय कुलकर्णी 23/04/2025

भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्य पुरस्काराकरीता म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्काराकरीता सर्वाथाने सार्थ असूनही डावललेल्या अभिनेत्री म्हणजे आपल्या मराठमोळ्या कलावंत ललिता पवार. तब्बल सत्तर वर्षे रूपेरी पडद्यावर वावरण्याचा त्यांचा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे. ललिताबाईचं बाईंचे एक वैशिष्ट्य होते त्या श्रीमंत स्त्रीच्या भूमिकेत असताना रुपेरी पडद्यावर तितक्याच ग्रेसफुल श्रीमंत दिसत आणि गरीब स्त्रीच्या भूमिकेत असल्या की तशाच लाचार हतबल दिसतं. भूमिकेत मिसळून जाणे त्यांना परफेक्ट जमत असे. राजकपूरच्या ‘श्री चारसो बीस’ मध्ये त्यानी साकारलेली गरीब केळेवाली आणि अनाडी चित्रपटात त्यानी साकारलेली श्रीमंत मिसेस डीसा! दोन्ही टोकाच्या भूमिका त्यानी सहज साकारल्या होत्या.

कपूर घराण्यातील तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले हा देखील एक विक्रम आहे.शांताराम बापूंनी दिग्दर्शित केलेल्या ’दहेज’ या सिनेमात त्या पृथ्वीराज कपूर सोबत चमकल्या.यात त्यांनी साकारलेल्या दुष्ट सासूच्या भूमिकेचा मोठा बोलबाला झाला होता. हुंडाबळी या सामाजिक समस्येला हात घालणारा हा सिनेमा इतका गाजला की भारत सरकारला देखील या सिनेमाची दखल घेवून हुंडा विरोधी कायदा बनवावा लागला.कपूर घरांयाच्या दुसर्‍या पिढीतील राजकपूर सोबत ललिता बाईंनी अनेक सिनेमात भूमिका केल्या. ‘श्री चारसो बीस’, ‘अनाडी’ , ‘परवरीश’ ,’ एक दिल सौ अफसने’ मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अनाडीत त्यांनी साकारलेल्या मिसेस डिसा या भूमिकेकरीता त्यांना फिल्मफेअर मिळाले. शम्मी कपूर सोबत ‘जंगली’, ‘प्रोफेसर’,’लाट साहब’,’ब्लफ मास्टर’ या सिनेमात त्यांनी काम केले. ‘प्रोफ़ेसर’ मधील त्यांनी साकारलेली रोमॅंटीक वृद्धा आजही जाणकारांच्या लक्षात आहे.

शशी कपूर सोबत ‘बिरादरी’, ‘सुहाना सफर’, ‘दुनिया मेरी जेब में’ या सिनेमातून ललिताबाई दिसल्या. राज-नर्गीसच्या ’प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यात पावसात छत्री घेवून जाणारे रणधीरकपूर व ऋषीकपूर बालकलाकार म्हणून दिसले. हे दोघे ललिता बाईं समोरच मोठे झाले. रणधीर कपूरच्या हमराही, खलिफा या सिनेमात त्यांनी भूमिका केली.ऋशी कपूर सोबत त्या ‘खेल खेल मे’ या सिनेमात होत्या. भारतीय सिनेमातील सर्वात मोठं घराणं म्हणजे कपूर घराणं .त्यांच्या तिन्ही पिढ्या सोबत काम ललिता बाईंनी केलं. कपूर कुटुंबाचं त्यांच्यावर विशेष प्रेम होतं.

सत्तरच्या दशकात इसाक मुजावर एकदा ललिताबाईंची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेले होते त्या वेळी राज कपूरचा फोन ललिताबाईंना आला व तो म्हणाला “मेरी आनेवाली एक फिल्म मे आप मेरे मॉं का रोल करोगी? अब इस उम्र मे मुझे आपके सिवा कौनसी दुसरी  मॉं मिलनेवाली है?” ऋषी-नीतूसिंग यांच प्रेम खेल खेल में च्या सेट्वर चांगलच बहरल होतं.चाणाक्ष ललिता बाईंच्या ते लक्षात आलं.त्या ऋषी कपूरला म्हणाल्या ’ बेटा ऋषी जल्दीसे शादी करले …मुझे तेरे बेटे के साथ भी तो काम करना हैं!’ आज ऋषी-नीतूचा मुलगा रणवीर आघाडीचा अभिनेता आहे पण ललिता बाई नाहीत त्या असत्या तर त्या नक्कीच त्याच्या सोबत दिसल्या असत्या.

आयुष्याच्या उत्तरार्धात त्या पुण्याच्या औंध परिसरात राहत असायच्या. २४ फेब्रुवारी १९९८ रोजी त्या घरात एकट्याच असताना त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात तसाच पडून राहिला. त्तिसऱ्या दिवशी लक्षात आले. मूकपटा पासून रुपेरी पडद्यावर वावर असणाऱ्या ललिता पवार यांचा असा दुर्दैवी अंत पटत नाही. फाळके पुरस्काराच्या तर त्या असली हकदार होत्या मात्र या पुरस्कारापासून राहिल्या. दिल्लीत आपले मराठी लॉबिंग कमी पडते.ललिता पवार यांच्या प्रमाणेच सुलोचना दिदी देखील अशाच वंचित राहिल्या.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood bollywood update Celebrity classic bollywood movies Entertainment Entertainment News Featured lalita pawar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.