Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात

Marathi Movies : थिएटर गाजवल्यानंतर ‘हे’ मराठी चित्रपट ओटीटीवर रिलीज

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mehmood : मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मेहमूदच्या खिशात एक पैसा ही नव्हता!

 Mehmood : मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मेहमूदच्या खिशात एक पैसा ही नव्हता!
बात पुरानी बडी सुहानी

Mehmood : मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मेहमूदच्या खिशात एक पैसा ही नव्हता!

by धनंजय कुलकर्णी 27/04/2025

साठ आणि सत्तर च्या दशकात आपल्या कॉमेडीने चित्रपटातील नायकांवर देखील भारी पडणारा  कलाकार म्हणजे विनोदी कलावंत मेहमूद.  साठच्या दशकात त्याचा पडद्यावरच वट एवढा जबरदस्त होता की अनेक मोठे कलाकार त्याच्या सोबत  चित्रपटात घ्यायला घाबरत होते. कारण मेहमूद चित्रपटात असला की त्याचीच चर्चा जास्त व्हायची नायकाला कोणी विचारतच नसायचे.त्या मुळे अनेक बडे सितारे मेहमूद पासून चार हात दूरच रहाणे पसंत करायचे!  पण मेहमूद ला हे यश सहजासहजी मिळालं नव्हतं. सुरुवातीला त्याला खूप स्ट्रगल करावा लागला होता.  त्याच्या इतका स्ट्रगल कदाचित दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याने केला असेल. (Mehmood)

अर्थात याला तो स्वत: देखील जबाबदार होता. तो गुणी कलाकार होता पण आपल्या करिअर बाबत सिरीअस नव्हता. त्या मुळे त्याच्या तील या अव गुणांनी त्याला प्रस्थापित व्हायला खूप काळ लागला.  त्याच्या स्ट्रगल पिरेड मध्ये अनेक संकटं आली. अभिनेत्री मीनाकुमारीची बहीण मधु हिच्या सोबत त्याने निकाह केला होता. खरंतर मेहमूद मीनाला टेबल टेनिस शिकवायला तिच्या घरी जात असे. त्याच वेळी मधू सोबत त्याची आंख मिचौली झाली. दोघे प्रेमात पडले.  खरंतर या लग्नाला दोन्ही घरातून मोठा विरोध होता कारण मेहमूद तेंव्हा  काहीच करत नव्हता. अक्षरशः आवारा गर्दी चालू होती. पण तरीही दोघांचे एकमेकावर अतोनात प्रेम होते आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न केले. (Bollywood tadaka)

लग्न झाल्यानंतर तरी मेहमूद सुधारेल असं वाटत होतं पण त्यात अजिबात सुधारणा होत नव्हती. मेहमूद च्या घरी अठरा विश्व दारिद्र्य. (त्याचे वडील मुमताज अली एकेकाळी बॉम्बे टोकीज चे नट. पण व्यसनाने घराची वाट लागली होती.)  त्यामुळे घरात सतत वाद होत असे.  या वादातूनच मेहमूदने आपल्या वडिलांचे घर सोडले आणि तो आपल्या बायकोसोबत स्वतंत्र राहू लागला.  याच काळात त्याची बायको प्रेग्नेंट होती. त्यावेळेला मेहमूदची आई त्याच्या मदतीला आली. जेव्हा त्याच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात ऍडमिट केले. (Entertainment classic news)

त्यावेळेला त्याच्या खिशात एकही पैसा नव्हता. लोकप्रिय अभिनेत्री मीनाकुमारी ची बहिण असल्यामुळे त्याने सरकारी दवाखान्याच्या ऐवजी एका खाजगी प्रसूती गृहात  तिला ऍडमिट केले.  परंतु त्याला काळजी होती बिल किती होईल आणि ते बिल कसे द्यायचे याची!  मेहमूद ची आई त्याला म्हणाली ,” तुझ्या वेळी जेव्हा मी दवाखान्यात ऍडमिट झाले तेव्हा मी खुदाकडे मला मुलगा व्हावा म्हणून अशी प्रार्थना केली आणि तुझा जन्म झाला तू देखील आता अशीच प्रार्थना कर!” त्यावर मेहमूद म्हणाला,” मला मुलगा होईल की मुलगी यापेक्षाही दवाखान्या चे  बिल मला कसं भरता येईल याची काळजी आहे!”  अखेर १४  जून १९५३  या दिवशी डिलिव्हरी झाली. मेहमूद बाप बनला. घरात सर्वत्र आनंद झाला. (Mehmood stories)

पण मेहमूद मात्र हॉस्पिटलचे बिल कसे पे करायचे याचीच  चिंता होती. योगायोगाने ज्या दिवशी मेहमूद च्या पत्नीला डिस्चार्ज मिळणार होता; त्या दिवशी मीनाकुमारी आपल्या भाच्याला बघण्यासाठी आली. रितीप्रमाणे ‘मुंह दिखाने कि रस्म’ मध्ये तिने मधुच्या बाळाच्या हातात  शंभर रुपये दिले ते पैसे पाहिल्यानंतर मेहमूदना खूप आनंद झाला. मीनाकुमारी गेल्यानंतर त्याने लगेच ते पैसे घेतले आणि तडक तो हॉस्पिटलच्या अकाउंट सेक्शनला गेला आणि बिल भरून टाकले. १९५३ साली  प्रायव्हेट नर्सिंग रूमचे  बिल ३५  रुपये झाले होते  आणि इतके पैसे देखील मेहमूद भरू शकत नव्हता. मीना कुमारी  आल्यामुळे त्याला ते पैसे भरता आले. मेहमूद ला आता आपलीच शरम वाटू लागली. त्याने आपल्या करीअरला सिरिअस ली घ्यायचे  ठरवले. (Entertainment)

==============

हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?

==============

काळ कधीच सारखा राहत नाही. मुलाच्या आगमनानंतर मेहमूद आपल्या करिअर बाबत सिरीयल झाला आणि हळूहळू त्याला यश मिळत गेले. आणि पुढच्या पाच दहा वर्षातच मेहमूद अक्षरशः सुपरस्टार झाला! (Bollywood untold stories)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor mehmood story Bollywood Bollywood Chitchat bollywood dhamaka bollywood update Celebrity News Entertainment entertainment tadaka mehmood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.