Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nana Patekar : ‘वेलकम’ चित्रपटातील डॉन उदय शेट्टी दिग्दर्शकांना कसा सापडला?

 Nana Patekar : ‘वेलकम’ चित्रपटातील डॉन उदय शेट्टी दिग्दर्शकांना कसा सापडला?
मिक्स मसाला

Nana Patekar : ‘वेलकम’ चित्रपटातील डॉन उदय शेट्टी दिग्दर्शकांना कसा सापडला?

by रसिका शिंदे-पॉल 29/04/2025

“आलू ले लो, कांदा ले लो” किंवा “कंट्रोल उदय कंट्रोल”;  हे डायलॉग कानांवर ऐकू आले की ‘वेलकम’ (Welcome Movie) चित्रपट आणि त्यात नाना पाटेकरांनी (Nana Patekar) साकारलेली उदय शेट्टी ही भूमिका डोळ्यांसमोर उभी राहते. नानांनी आजवर गंभीर भूमिका अधिक साकारल्या. पण त्यांनीच आपल्या अभिनयाची ठराविक चौकट मोडून काढत २००७ मध्ये त्यांनी ‘वेलकम’ हा चित्रपट केला आणि उदय शेट्टी ही भूमिका अजरामर केली. मात्र, नेमकी ही भूमिका आणि चित्रपट नाना पाटेकर यांना कसा मिळाला त्याचा एक किस्सा आहे. वाचा… (Bollywood gossips)

मुळात चित्रपटांमध्ये येण्याचं स्वप्न कधीच न पाहणारे नाना आपल्या रंगभूमीवर आनंदी होते. पण ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांनी नाना पाटेकर यांना चित्रपटसृष्टीत आणलं. १९७८ मध्ये गमन या चित्रपटातून त्यांचा हिंदी चित्रपटांचा प्रवास सुरु झाला तो आजतागायत सुरुच आहे. तर ‘वेलकम’ चित्रपटातील उदय हे पात्र नानांची इमेज पुर्णपणे बदलवून टाकणारं होतं. डॉन उदय शेट्टीची भूमिका कशी मिळाली याबद्दल दिग्दर्शक अनीस बाझ्मी यांनी एक किस्सा सांगितला होता. (Welcome movie untold story)

तर, कपिल शर्मा शोमध्ये त्यांनी ‘वेलकम’ चित्रपटात नाना पाटेकर यांना कास्ट करणं जरा कठिण होतं असं सांगितलं. नानांशिवाय उदय शेट्टी ही भूमिका कुणी करुच शकलं नसतं असंही अनीस म्हणाले होते. अनीस म्हणाले की, “मी सुरुवातीपासूनच नाना पाटेकरांचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे, मला सुरुवातीपासूनच माहित होतं की ते गंभीर भूमिका खूप चांगल्या प्रकारे करतात. पण ज्या दिवशी ते विनोदी भूमिका करतील, त्या भूमिकाही ते खूप चांगल्या प्रकारे करतील.” (Entertainment news)

==============

हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!

==============

पुढे ते म्हणाले, ‘मी नानांना फोन केला आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी मला का असं विचारलं? मी म्हणालो की मला तुम्हाला एका चित्रपटाची गोष्ट सांगायची आहे. ते म्हणाले ये. आणि मी त्यांना भेटायला गेलो. जेव्हा मी त्यांना सांगितले की हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. ते ऐकताक्षणी नाना म्हणाले मला कथा ऐकायची नाहीये.  तू तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की हा चित्रपट माझ्यासाठी योग्य आहे आणि मी तो करायला हवा. त्यावर मी म्हणालो तुम्ही एकदा कथा ऐका”. (Nana patekar news)

कथा सांगायला साडेतीन तास लागणार होते पण नाना म्हणाले की ३ तास आहेत गोष्ट सांग. अखेर अनीस यांनी वेलकम चित्रपटाची संपूर्ण गोष्ट नाना पाटेकर यांना ऐकवली आणि ती ऐकताच नानांनी अनीस यांना मिठी मारली आणि ते म्हणाले की,”अनीस, मी कच्च्या मातीसारखा आहे, मी सेटवर येईन, तू मला तुला हव्या त्या आकारात घडवू शकतोस”. खरं तर नाना पाटेकर फार रागीट आहेत, त्यांच्यासोबत काम करणं कठिण आहे असं बरेच मेकर्स सांगतात. पण अनीस म्हणाले की, “नानांसोबत काम करताना मला कुठलाही त्रास झाला नाही. त्यांच्यासोबत काम करणं उलट सर्वात सोप्पं काम आहे”. (Bollywood update)

‘परिंदा’, ‘अंगार’, ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’, ‘अब तक छप्पन’ अशा चित्रपटांमधील नाना पाटेकर ‘वेलकम’ चित्रपटात तसं पाहायला गेलं तर डार्क भूमिकाच सादर करताना दिसले होते पण तिला विनोदाची झालर होती. २००७ मध्ये आलेल्या ‘वेलकम’ (Welcome Movie) चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. एकीकडे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या कॉमेडी चित्रपटांसमोर अनीस बाझ्मी यांनीही एक वेगळा प्रयत्न करुन पाहिला होता आणि तो यशस्वी झाला होता. वेलकम चित्रपटात अक्षय कुमार, कटरिना कैफ, अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल, मल्लिका शेरावत, फिरोज खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने ७०.१५ कोटींची कमाई केली होती. ओम शांती ओम या चित्रपटानंतर २००७ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) यांच्या ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) चित्रपटाने ७८.१६ कोटी कमावले होते. (Bollywood movies box office collection)

२००७ मध्ये आलेल्या ‘वेलकम’ चित्रपटाचा ‘वेलकम रिटर्न्स’ (Welcome Returns) हा एक भाग आला होता. पहिल्या भागाइतका दुसरा भाग खरं तर फार गाजला नाही. पण आता लवकरच वेलकम टु द जंगल हा तिसरा भाग २०२५ मध्ये येणार असून यात नाना पाटेकर दिसणार नाहीत. ज्यांनी खरं तर हा चित्रपट आणि उदय शेट्टी ही भूमिका मोठी केली तेच या चित्रपटात नसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. याबद्दल नानांनी देखील आपलं मत व्यक्त करत म्हटलं होतं की, “वेलकम टू द जंगल’ सिनेमासाठी मला विचारण्यात आलेलं नाही. आम्ही आता फार जुने झालो आहोत कदाचित त्यांना असं वाटत असेल”. (Welcome To The Jungle)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akshay Kumar anil kapoor Bollywood bollywood movies Celebrity News Classic movies comedy movies Entertainment feroz khan Katrina kaif majanu bhai nana patekar paresh rawal uday shetty welcome movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.