
Gulkand : ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटांची कमाई किती?; मिळतोय हाऊसफुल्लचा प्रतिसाद!
नुकताच केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan0 याने या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर आता ‘रेड २’ (Raid 2) या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी दोन मराठी चित्रपट १ मे २०२५ रोजी रिलीज झाले. ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ हे दोन्ही चित्रपट सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत असून मुंबईत ‘गुलकंद’ चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल सुरु आहेत. जाणून घेऊयात या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे. (entertainment news)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘गुलकंद’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५ लाखांची कमाई केली आहे. तर ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने ४५ लाखांची कमाई केली आहे. वर्ल्डवाईड गुलकंदने ६२ लाख कमावले असून आता थांबायचं नायने ५१ लाख कमावले आहेत. तर सूरज चव्हाणच्या न चित्रपटाने आत्तापर्यंत १.८ कोटी आणि वर्ल्डवाईड १.२४ कोटी कमावले आहेत. (Gulkand box office collection)

गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत बॉक्स ऑफिसवरील कमाई लक्षात घेता अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांचा ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर असून आत्तापर्यंत या चित्रपटाने १.१२ कोटी कमावले आहेत. (Marathi films 2025 box office collection)
===============================
हे देखील वाचा: गुलकंद सिनेमामध्ये समीर चौघुले आणि Sai Tamhankar ची हटके जोडी पहिल्यांदाच एकत्र..
===============================
‘गुलकंद’ या चित्रपटात सई ताम्हणकर (Sai Tamhankar), समीर चौघुले, ईशा डे आणि प्रसाद ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, आता थांबायचं नाय या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमघर, रोहिणी हट्टंगडी,ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Marathi movie news)