“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Waves summit 2025 : “माझे चित्रपट फ्लॉप झाल्यावर प्रेक्षकांचा विश्वास”; काय म्हणाला किंग खान?
हिंदी चित्रपटसृष्टीवर सध्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) राज्य करत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फिल्मी इंडस्ट्रीचं कनेक्शन नसतानाही केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज शाहरुख खान किंग खान बनू शकला. १९९२ साली ‘दीवाना’ या चित्रपटातून शाहरुखने आपली अभिनयाची कारकिर्द सुरु केली ती आजतागायत सुरु आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves summit 2025) मध्ये ‘फ्रॉम आऊटसाइडर टू रूलर’ या चर्चा सत्रात शाहरुख खान याने स्वत:चे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर काय भावना होत्या त्या व्यक्त केल्या. (Bollywood news)

शाहरुख खान (Shah rukh khan) म्हणाला की, “भारतीय मनोरंजनसृष्टीत अढळ स्थान निर्माण करायचे, या एका ध्येयाने मी झपाटलो होतो. मी इथे आलो, मनोरंजनसृष्टीचे निरीक्षण केले आणि मी माझा मार्ग निवडला. मी या विश्वाचाच भाग आहे, असे समजून मेहनत करत गेलो आणि त्याला प्रेक्षकांची उत्तम अपेक्षित साथ लाभली. चित्रपट फ्लॉप झाले तेव्हा माझ्या प्रेक्षकांचा विश्वास गमावल्याचे दुःख झाले. पण हार न मानता प्रेक्षकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पुन्हा उभा राहिलो”, असं खान म्हणाला. पुढे शाहरुख म्हणाला की, “मी सिनेपार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील नाही, या विचाराने मी कधीच घाबरून गेले नाही. उलट, हाच विचार माझ्यासाठी प्रेरणा देणारा ठरला”. (Entertainment tadaka)
===============================
हे देखील वाचा: Waves Summit 2025: “प्रियांकाप्रमाणे हॉलिवूडमध्ये काम का करत नाही?”; करिना म्हणते….
===============================
“भारतात पुरेसे चित्रपटगृहच नाहीत…” आमिर खानची खंत
“भारतीय चित्रपट सृष्टीत जेव्हा कोणताही चित्रपटसुपरहिट होतो तेव्हा त्याचा फुटफॉल काय असतो? जगभरात आपल्या देशाची ओळख सिनेप्रेमी म्हणून होते. दरवर्षी आपल्या देशात सर्वात जास्त सिनेमांची निर्मिती होते. तर आपल्या देशातील केवळ २ टक्के लोक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातात. ९८ टक्के लोक सिनेमावर पैसे खर्च करत नाहीत. मला वाटतं भारतात जास्तीत जास्त थिएटर्स उभारले पाहिजे. देशातील अनेक भागांमध्ये तर थिएटर्सच नाहीत. जोपर्यंत आपण संपू्र्ण देश व्यापणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला सिनेमा पोहोचवणार नाही तोपर्यंत आपण सिनेमालविंग देश होणार नाही. अनेक लोक असते आहेत ज्यांना सिनेमा पाहण्यासाठी जायचं आहे मात्र थिएटर्सच नाहीत.” (Amir khan at waves summit 2025)