Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Mukkam Post Devach Ghar: ५ भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट
मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट ‘मुक्कम पोस्ट देवाच घर’ (Mukkam Post Devach Ghar) हा पाच भारतीय भाषांमध्ये डब करून प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला असून मराठी चित्रपट बनला आहे.प्राईम व्हिडिओवर आपल्याला या चित्रपटाचा आनंद लुटता येणार आहे. (Marathi movies)

“मराठी भाषेत जेव्हा आम्ही हा चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम, अभिप्राय याचा विचार करून आम्ही हा चित्रपट इतर भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाची कथा ही कोणत्याही एका विशिष्ठ भाषेतील लोकांची नसून आपल्या सर्वांच्या सभोवताली घडणारी अशी आहे. ही कथा देशभरातील अधिकाधिक लोकांपर्यंत आणि घरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे”, असे चित्रपटाचे निर्माते म्हणाले. (indian cinema)
==============================
हे देखील वाचा: Atali Batmi Fhutali: अभिनेते विजय निकम झाले ‘टायगर भाई’!
===============================
निरागसता, उबदारपणा आणि भावनिक खोलीने भरलेले एक मार्मिक कथानक, “मुक्कम पोस्ट देवाच घर” या चित्रपटाने त्याच्या मूळ मराठी स्वरूपात आधीच जिंकले आहे. आकर्षक कथा, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर प्रदर्शन करण्याची योजना सुरू असल्याचे देखील टीमने आता सांगितले आहे. (Entertainment) ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात मायरा वायकुळ, माधवी जुवेकर, मंगेश देसाई, प्रथमेश परब, कल्याणी मुळ्ये, उषा नाडकर्णी, सविता मालपेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.