DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!
‘मुंबईचा जावई’, ‘धुमधडाका’, ‘अवघाची संसार’, ‘जावई विकत घेणे आहे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारे अभिनेते शरद तळवलकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा ब्लॅक अॅंण्ड व्हाईट ते रंगीत असा काळा गाजवला. आणि आता आपल्या आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून शरद तळवलकरांचा (Sharad Talvalkar) नातू थेट हॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवतोय…(Bollywood news)
शरद तळवलकर यांचं २००१ मध्ये निधन झालं आणि कलाविश्वातून एक हरहुन्नरी कलाकार हरपल. शरद तळवलकर यांना उमेश आणि हेमंत अशी दोन मुलं आणि ही दोन्ही मुलं परदेशात लहानाची मोठी झाली. त्यांचा हेमंत हा मुलगा १९७७-८० च्या काळात त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत होता. आता त्यांचाच मुलगा कपिल तळवलकर (Kapil Talvalkar) आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयात आपलं करिअर करत आहे. लहानपणापासून अभिनयाची निर्माण झालेली आवड कपिलला ‘अमेरिकन प्रिन्सेस’ चित्रपटातून हॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.(Entertainment)

कपिलने शाळा आणि कॉलेजमध्ये असताना नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यानं युनिव्हर्सिटीमधून अभिनय आणि संगीताचं शिक्षण घेतलं. आणि आता कपिलने हॉलिवूडमध्ये अभिनेता, संगीतकार, पटकथाकार, लेखक अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सातासमुद्रापार कपिल मराठमोळे अभिनेते शरद तळवलकर यांच्या अभिनयाची परंपरा पुढे नेत आहे. तसेच, कपिल’झोयास एक्सट्रा ओर्डीनरी’, ‘ख्रिसमस चार्म सिरीजच्या’ चारही सीझनमध्ये झळकला होता. इतकंच नव्हे तर तो ‘सेशन १९’ या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. कपिल तळवलकर केवल एक अभिनेताच नाही तर डबिंग आर्टिस्ट देखील आहे.(Bollywood update)
================================
हे देखील वाचा: Aishwerya Rai : ९० च्या दशकातील मनिषा-ऐश्वर्याची गाजलेली कॅट फाईट!
=================================
दरम्यान, एका मराठी कलाकाराचा नातू हॉलिवूडमध्ये उल्लेखनीय काम करतोय हे पाहून प्रत्येक भारतीय आणि मराठी कलाकाराला नक्कीच अभिमान वाटणारच. शरद तळवलकर यांनी खरं तर मराठी चित्रपटांमध्ये छोटेखानी किंवा साईड रोल्स केले पण चित्रपटाच्या कथानकात त्यांच्या पात्राचं अनन्यसाधारण महत्व कायम होतं. त्यामुळे शरद तळवलकर, सुधीर जोशी, रिमा लागू, स्मिता पाटील असे दिग्गज कलाकार खरंच मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा होणे नाही. पण त्यांच्या चित्रपटांमुळे ते कायमच स्मरणात राहातील यात शंका नाही.(Entertainment trending news)