Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास     

 Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास     
मिक्स मसाला

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास     

by Team KalakrutiMedia 05/06/2025

Mata Ahilyadevi Biopic: इतिहासावर आधारित चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या नेहमीच आवडते ठरले आहेत. भारतीय इतिहासात ज्या स्त्रियांनी समाज बदलवला, शासनाच्या आणि संस्कृतीच्या पातळीवर अमिट छाप सोडली त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान सर्वार्थाने वेगळं आहे. आता त्यांच्या या अद्वितीय जीवनप्रवासावर आधारित एक भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी’ २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा इतिहासाचा सुवर्णकाळ झळकणार आहे.(Mata Ahilyadevi Holkar Marathi Biopic Movie)

================================

हे देखील वाचा:

================================

या चित्रपटाची खासियत म्हणजे तो २०२६ मध्ये, अहिल्यादेवींच्या ३००व्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार आहे. एक आदर्श शासिका, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाने आजही अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कार्याला सिनेमाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या चित्रपटातून त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाची झलक नव्या पिढीसमोर येणार आहे. 

Mata Ahilyadevi Holkar Marathi Biopic Movie

या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील मुनोत प्रॉडक्शन आणि ओझोन एंटरटेनमेंट यांच्यावतीने केली जात आहे. स्वप्नील संजय मुनोत आणि धनंजय कृष्णा जाधव यांनी लेखन व दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, जयकुमार मुनोत आणि अमोल खोले सहनिर्माते आहेत. चित्रपटासाठी गेली दोन वर्षे अथक तयारी सुरू असून, या भव्य चित्रपटात राजमातेचा प्रेरणादायी संघर्ष, सामाजिक सुधारणांचे कार्य आणि हिंदुस्थानच्या रक्षणासाठी घेतलेली भूमिका प्रभावीपणे मांडली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ मराठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणास्त्रोत आहे. जात, धर्म, वर्ग या भेदांना झुगारून त्यांनी प्रजेसाठी न्यायनिवाडे केले, जनकल्याणकारी योजना राबवल्या, मंदिरांची निर्मिती केली आणि एक समतावादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

==================================

हे देखील वाचा: Nandamuri Taraka Rama Rao: एक असा कलाकार ज्याने १७ सिनेमांमध्ये साकारले ‘कृष्ण’; लोक देव समजून करायचे अभिनेत्याची पूजा… 

===================================

या सर्व गोष्टींचं प्रभावी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर सहा वेगवेगळ्या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे अहिल्यादेवींचा सन्मान देशभर पोहोचणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ahilyadevi Holkar Marathi Biopic Entertainment Marathi Movie Mata Ahilyadevi Holkar Marathi Biopic Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.