Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Rashmika Mandanna आणि धनुष कचऱ्याच्या ढिगाऱ्यात का बसले होते?
२०२४ पासून अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचं नशीब चांगलंच लकाकलं आहे. ‘अॅनिमल’ (Animal Movie), ‘छावा’ (Chhaava), ‘सिकंदर’ या बॉलिवूडमधल्या गाजलेल्या चित्रपटानंतर आता लवकरच साऊथमध्ये तिचा ‘कुबेरा’ (Kuberaa Movie) हा चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. धनुष आणि नागार्जून यांच्यासोबत कुबेरा मध्ये रश्मिका स्क्रिन शेअर करणार असून नुकतंच या चित्रपटातील एक गाणं रिलीज झालं. मुंबईत आयोजित केलेल्या या कार्यक्रमावेळी धनुषने (Dhanush) रश्मिका आणि तो ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बसल्याचा किस्सा त्याने सांगितला.(Bollywood news)

‘कुबेरा’ चित्रपटातील ‘पिप्पी पिप्पी दम दम’ हे गाणं लाँच करण्यात आलं. या इव्हेंटमध्ये धनुषने शूटींग दरम्यान घडलेला किस्सा सांगितला. धनुषने यावेळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शूट झालेल्या सीनविषयी एक खास किस्सा सांगितला. तो म्हणाला की, “मी आणि रश्मिका ६ ते ७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो. माझ्यापेक्षा रश्मिका एकदम नॉर्मल होती; तिला कसलाच दुर्गंध येत नव्हता. बातम्यांमध्ये आम्ही हा सीन मास्क लावून शूट केला असं वाचलं; पण हे खरं नाही आहे. आम्ही मास्क न लावता तो संपूर्ण सीन शुट केला आहे आणि आम्हाला कुठलीच अडचण आली नाही”, असं स्पष्टीकरणही धनुषने यावेळी दिलं.(Tollywood movies)
================================
हे देखील वाचा: Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
=================================
विशेष म्हणजे धनुष, रश्मिका आणि नागार्जून (Nagarjuna Akkineni) पहिल्यांदाच एकमेकांसोबत या चित्रपटात काम करणार आहेत. शेखर कमुला दिग्दर्शित कुबेरा या चित्रपटात दिलीप ताहिल, जिम , प्रियांशु चॅटर्जी, भागवती पेरुमल असे बरेच कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. २० जून २०२५ रोजी कुबरे चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेत देशभरात रिलीज होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi