
Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, ; शेअर केली पोस्ट
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत प्रवासी आणि नागरिकांसह विमानातील क्रु मेंबर्सनेही जीव गमावला आहे. १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जाऊन एका मेडिकल कॉलेजवर क्रॅश झालं होतं. दरम्यान, या विमान अपघातात अभिनेता विक्रात मेस्सी याने त्याचा वैमानिक मित्र गमावला आहे. (Ahemdabad airplane crash 2025)

दरम्यान, विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) याचा मित्र क्लाइव्ह कुंदरचं निधन झालं असून तो एक वैमानिक होता. या दुर्घटनेत क्लाइव्हचं निधन झाल्याने विक्रांत आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याच्या निधनानंतर विक्रांतने भावूक पोस्ट शेअर केली आहे. विक्रांतने लिहिले आहे की,”कोणीही कल्पना केली नव्हती अशा अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या दुःखद अपघातात ज्यांना आपला जीव गमवावा लागला अशा लोकांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना जे दुःख झालं, त्याचा विचार करुन मी खूप भावुक झालो आहे”. (Bollywood news)
================================
=================================
पुढे त्याने लिहिलं आहे की,”याशिवाय या दुर्घटनेत माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदरला गमावलं आहे. क्लाइव्ह त्यावेळी दुर्दैवाने त्या फ्लाइटमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून काम करत होता. या दुःखातून सावरण्यासाठी देव माझ्या काकांच्या परिवाराला शक्ती देवो”. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला त्या विमानासाठी कुंदर को-पायलटची जबाबदारी सांभाळत होता.(Entertainment update)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi