Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

 Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!
बात पुरानी बडी सुहानी

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

by धनंजय कुलकर्णी 14/06/2025

हॉलीवूडच्या चित्रपटांचे आकर्षण जसे भारतीय प्रेक्षकांना असते तसेच भारतीय कलाकारांना देखील असते. कारण हॉलिवूडच्या चित्रपटात काम करायची संधी मिळणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असतं. अनेक भारतीय कलाकारांनी हॉलीवुडच्या चित्रपटात काम केलं आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा तर ऐश्वर्या बच्चन, इरफान खान, अनिल कपूर, अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा,अनुपम खेर, डिम्पल कपाडिया,फ्रिडा पिंटो, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर , ओम पुरी, रणदीप हुडा, आय एस जोहर , शबाना आझमी…. हि यादी खूप मोठी आहे.

मात्र, एक भारतीय कलाकार असा आहे ज्याने एका मोठ्या स्केलवर बनणाऱ्या हॉलीवुड चित्रपटात काम करायला चक्क नकार दिला होता !! कोण होता तो कलाकार आणि कोणता होता तो चित्रपट? त्याच्या चाहत्यांना मात्र कायम असं वाटायचं की खरच जर त्याने हॉलीवूडच्या त्या चित्रपटात काम केलं असतं तर भारतीय सिनेमाचा इतिहासच बदलून गेला असता. पण तसं घडलं नाही. त्या कलाकाराने चित्रपटात काम करण्यासाठी नम्र नकार दिला. हा कलाकार होता अभिनय सम्राट दिलीपकुमार. (Dilip Kumar Movies)

१९६२ साली हॉलीवडचा एक बिग बजेट सिनेमा आला होता ‘द लॉरेन्स ऑफ अरेबिया’. हा सिनेमा T. E. Lawrence यांच्या आयुष्यावर आणि १९२६ साली आलेल्या त्यांच्या Seven Pillars of Wisdom  पुस्तकावर आधारीत होता.डेव्हिड लिन दिग्दर्शित या चित्रपटात चे कथानक मिडल इस्ट मधले होते. या सिनेमात Peter O’Toole, Omar Sharif, Alec Guinness , Anthony Quinn , Jack Hawkins , José Ferrer , Anthony Quayle , Claude Rains Arthur Kennedy यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यातील खरीशअली या भूमिकेसाठी त्यांना नॉन युरोपियन कलाकार हवा होता जेणेकरून त्या भूमिकेला पूरक अशी त्याची देहबोली असेल.

================================

हे देखील वाचा: Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!

=================================

डेव्हिड लीन यांना भारतीय अभिनेता दिलीप कुमार यांच्याबद्दल माहिती होती. याचं कारण डेव्हिड लीन यांची चौथी पत्नी लैला ही हैदराबादची होती आणि तिच्याकडून दिलीप कुमारच्या अभिनयाबाबत माहिती होती. डेव्हिड लीन दिग्दर्शित The Bridge on the River Kwai हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. याला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. यानंतर त्यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट लॉरेन्स ऑफ अरेबिया ची तयारी सुरू केली. खरीश अलीच्या भूमिकेसाठी ते दिलीप कुमारकडे अप्रोच झाले. ते स्वत: भारतात येऊन त्यांनी दिलीप कुमारला सर्व भूमिका समजावून सांगितली. आणि आपल्या सिनेमात काम करण्याची विनंती केली. पण दिलीप कुमारने चित्रपटात काम करायला नम्र नकार दिला.

डेव्हिड लीन यांना आश्चर्य वाटले कारण त्या काळात हॉलिवूडच्या चित्रपटात काम करण्याचे स्वप्न जगभरातील प्रत्येक कलाकार पाहत असताना एक कलावंत मात्र हॉलीवुड चित्रपटात काम करायला नकार देत होता! दिलीप कुमार यांनी नकार दिल्यानंतर डेव्हिड लीन यांनी खारीश अलीच्या भूमिकेसाठी एक इजिप्शियन कलाकार ओमर शरीफ ला निवडले. चित्रपट पूर्ण झाला. जगभर प्रचंड गाजला. या चित्रपटाला तब्बल दहा ऑस्कर नामांकाने मिळाले. त्यातील सात पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. ओमर शरीफ यांना देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नामांकन मिळालं होतं. त्यांना पुरस्कार मिळाला नाही पण या चित्रपटापासून त्यांचे आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण झाली आणि पुढे अनेक चित्रपटात उमर शरीफ दिसले, १९६९ साली आलेला  McKenna’s Gold  हा त्यांचा गाजलेला चित्रपट.

दिलीप कुमार यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटात काम करायला का नकार दिला याची अनेक कारणे सांगितली जातात. दिलीपकुमार यांनी मात्र कधी याबाबत फारसं काही सांगितलं नाही. २०१२ साली आलेल्या त्यांच्या आत्मचरित्रात देखील या नकाराबाबत काहीही स्पष्टता दिलेली नाही. २०१५ साली सायरा बानू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की,” दिलीप कुमार यांना कधीच हॉलिवूडच्या सिनेमात काम करण्याचे आकर्षण नव्हते.” काही समीक्षकांच्या मते दिलीप कुमारने ही भूमिका यासाठी नाकारली की नाही म्हटलं तरी ही भूमिका फुल लेंथ नव्हती. मोठ्या तलावातील छोटा मासा बनवू राहण्यापेक्षा छोट्या तलावातील मोठा मासा राहणे चांगले ही कदाचित त्याची विचारसरणी असावी.

================================

हे देखील वाचा: Dilip Kumar : दिलीप कुमार यांचा ‘काला आदमी’ हा सिनेमा का बनला नाही?

=================================

दुसरं महत्वाचे कारण म्हणजे ज्या काळात या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ ची निर्मिती चालू होती त्याच वेळी दिलीप कुमार यांची स्वतःची निर्मिती असलेला ‘गंगा जमुना’ या सिनेमाचे शूटिंग चालू होतं हे देखील कारण नकाराचे असू शकतोते. कारण काहीही असो पण दिलीप कुमारने हॉलीवूडचा चित्रपट नाकारला हे नक्की. कुणी सांगावे दिलीप कुमार ने ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ त काम केले असते तर हा चित्रपट त्यांच्यासाठी हॉलिवूडचे दार उघडे करणारा ठरला असता. दिलीप कुमारने आणखी बऱ्याच भूमिका हॉलीवुड सिनेमा मध्ये रोल केले असते. त्यामुळे भारतीय सिनेमाचा इतिहास बदलून गेला असता. पण हे व्हायचं नव्हतं.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood movies bollywood update Celebrity Celebrity News dilip kumar movies Entertainment entertainment update Hollywood Movies Indian Cinema
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.