Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘ट्रॅजडी क्वीन’ Meena Kumari यांच्या बायोपिकमधून ‘ही’ अभिनेत्री करणार कमबॅक?

 ‘ट्रॅजडी क्वीन’ Meena Kumari यांच्या बायोपिकमधून ‘ही’ अभिनेत्री करणार कमबॅक?
मिक्स मसाला

‘ट्रॅजडी क्वीन’ Meena Kumari यांच्या बायोपिकमधून ‘ही’ अभिनेत्री करणार कमबॅक?

by रसिका शिंदे-पॉल 24/06/2025

हिंदी चित्रपटसृष्टीचा ४० ते ७०च्या दशकातील काळ आपल्या मनमोहक सौंदर्य, अदाकारी आणि अभिनयाने गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी (Meena Kumari)… भारतीय चित्रपटांच्या इतिहासात त्यांचं नाव ‘ट्रेजेडी क्वीन’ म्हणून ओळखलं गेलं… मीना कुमारी यांच्या चित्रपटांची जितकी चर्चा झाली त्यापेक्षा अधिक त्यांचं वैयक्तिक आयुष्य म्हणजे हॉट टॉपिक होता आणि आजही आहे…मीना कुमारी यांच्या बायोपिकची घोषणा झाल्यापासून त्यांची भूमिका कोण साकारणार यावरुन वेगवेगळ्या अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत… क्रिती सेनॉन (Kriti Sanon) हिचं नाव प्रामुख्याने मीना कुमारींच्या भूमिकेसाठी चर्चेत असताना आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं असून तिचा हा कमबॅक असेल असं म्हटलं जात आहे… कोण आहे हि अभिनेत्री जाणून घेऊयात…(Bollywood Biopics)

मीना कुमारी यांच्या बायोपिकची निर्मिती सारेगामा आणि अमरोही कुटुंब करणार आहेत. आधी मीना कुमारींच्या भूमिकेसाठी क्रिती सेनॉन हिचं नाव समोर येत होतं; पण आता कियारा अडवाणी (Kiara Advani) हिचं नाव चर्चेत आलं आहे… पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या टीमने कियारा अडवाणी हिला कथा ऐकवली असून तिला प्लॉट फार आवडला आहे… मात्र, सध्या ती गरोदर असल्यामुळे तिने या बायोपिकसाठी होकार अद्याप कळवला नाही आहे… परंतु, जर का कियारा अडवाणी हिने मीना कुमारींच्या जीवनावरील बायोपिकसाठी होकार दिल्यास मॅटर्निटी सुट्टीनंतर कियाराचं कमबॅक असणारा हा पहिला चित्रपट ठरु शकतो…(Bollywood latest news)

कियारा अडवाणी ‘वॉर २’ आणि ‘टॉक्सिक’ या चित्रपटात झळकणार आहे… मॅटर्निटी सुट्टीवर जाण्यापूर्वीच तिने या दोन्ही चित्रपटांचं शुटींग पुर्ण केलं आहे… आजवर कियाराने ‘एम.एस.धोनी’, ‘कबीर सिंग’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘गुड न्यूज’, ‘शेरशाह’ अशा चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना दिसली आहे… मात्र, जर का मीना कुमारी यांची भूमिका तिने साकारली तर तिच्या अभिनय करिअरमधील हा सर्वात मोठा टर्निंग पोईंट नक्कीच ठरु शकतो…(Kiara Advani movies)

================================

हे देखील वाचा: Indian Cinema : ‘गुड्डी’ ते ‘जब वी मेट’ ; बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथ रिमेक्स!

=================================

४० ते ७०चं हिंदी चित्रपटसृष्टीचं दशक गाजवणाऱ्या मीना कुमारी यांचा जन्म १९३२ मध्ये मुंबईत झाला…वयाच्या ७व्या वर्षापासून बालकलाकार म्हणून मीना कुमारी यांनी अभिनयाची सुरुवात केली होती.. ‘लेदरफेस’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता… त्यानंतर मीना कुमारींनी ‘बैजू बावरा’, ‘दो भीगा जमीन’, ‘शारदा’, ‘शरारत’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘फुल और पत्थर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली… अभिनयासोबतच मीना कुमारी ‘नाज’ या टोपणनावाने कविता देखील लिहायच्या.. दुर्दैवाची बाब म्हणजे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झालं होतं.. त्यामुळे आता मीना कुमारी यांचं Tragedic आयुष्य कशाप्रकारे बायोपिकमध्ये मांडलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(Meena Kumari movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood tadaka bollywood update Celebrity Entertainment entertainment news in marathi Indian Cinema kiara advani kriti sanon marathi entertainment news meena kumari meena kumari biopic tragedy queen of bollywood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.