Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sholay Re-Release: गब्बर पुन्हा विचारणार ‘कितने आदमी थे’; अनकट वर्जनसोबत ‘या’दिवशी रिरिलीज होणार ‘शोले’!

 Sholay Re-Release: गब्बर पुन्हा विचारणार ‘कितने आदमी थे’; अनकट वर्जनसोबत ‘या’दिवशी रिरिलीज होणार ‘शोले’!
मिक्स मसाला

Sholay Re-Release: गब्बर पुन्हा विचारणार ‘कितने आदमी थे’; अनकट वर्जनसोबत ‘या’दिवशी रिरिलीज होणार ‘शोले’!

by Team KalakrutiMedia 24/06/2025

भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कल्ट चित्रपट म्हणजे ‘शोले’ (Sholay). या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनातही कायमचं स्थान मिळवलं आहे. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमाला यंदा ५० वर्षं पूर्ण होत आहेत. ही खास संधी लक्षात घेऊन ‘शोले’चं अनकट व्हर्जन पुन्हा प्रदर्शित केलं जाणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार आणि अमजद खान यांची दमदार भूमिका होती. गब्बर सिंह आणि जय-वीरू यांची जोडी आजही लोकांच्या आठवणीत ताजी आहे. ‘शोले’चं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं होतं आणि आता त्याचंच खास रूप प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. (Sholay Movie Re-Release)

Sholay Movie Re-Release

यावेळी ‘शोले’चं जे अनकट व्हर्जन दाखवलं जाणार आहे, त्यात कधीच न पाहिलेले सीन असणार आहेत. उदाहरण द्यायचं झालं, तर या नव्या आवृत्तीत ‘ठाकूर गब्बरला ठार मारतो’ असा सीन देखील दिसणार आहे, जो मूळ थिएटर रिलीजमध्ये नव्हता. हा सीन CBFC (सेंसर बोर्ड) च्या सूचनेनंतर पूर्वी कापण्यात आला होता.

Sholay Movie Re-Release

या नव्या रीलिझचा प्रीमियर २७ जून २०२५ रोजी इटलीतल्या बोलग्ना शहरात होणार आहे. इथे दरवर्षी ‘Il Cinema Ritrovato’ नावाचा एक खास फिल्म फेस्टिव्हल भरतो, जिथे जगभरातील दिग्गज क्लासिक चित्रपट दाखवले जातात. ‘शोले’ची स्क्रीनिंग प्रसिद्ध Piazza Maggiore मध्ये होणार आहे. हे ठिकाण सुद्धा क्लासिक सिनेमांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक उपक्रमासाठी Film Heritage Foundation आणि Sippy Films Pvt. Ltd. यांनी एकत्र येऊन काम केलं आहे. त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे ‘शोले’चा अनुभव आजच्या पिढीपर्यंत त्याच्या मूळ आणि अखंड स्वरूपात पोहोचवणे.(Sholay Movie Re-Release)

=================================

हे देखील वाचा:  Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या  उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’ सिनेमाच टायटल साँग लाँच!

================================== 

अमिताभ बच्चन यांनी यावर आनंद व्यक्त केला असून धर्मेंद्र यांनी ‘शोले’ला “जगातील आठवं आश्चर्य” असं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, “त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की, हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरेल. अपयशी ठरल्यापासून ते बॉक्स ऑफिसवरच्या विक्रमी कामगिरीपर्यंतचं नाट्यमय परिवर्तन आपल्या सर्वांसाठी एक भावनिक रोलरकोस्टर होतं… मला आशा आहे की, 50 वर्षांनंतरही हा चित्रपट जगभरातील नव्या प्रेक्षकांच्या कल्पनांना आकर्षित करेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.