‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Sunny Deol : दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण महाकाव्याला न्याय नक्कीच देतील!
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची प्रेक्षक फार आतुरतेने वाट पाहात आहेत… प्रभू श्रीराम म्हणजे हिंदू बांधवांचं श्रद्धास्थान… आजवर चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून रामायण सादर केलं गेलं; परंतु बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच सर्वात मोठा बिग बजेट असलेला रामायण हा पहिला पौराणिक चित्रपट ठरणार आहे… या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार असून हनुमानाच्या भूमिकेत सन्नी पाजी दिसणार आहेत… लवकरच सनी देओल (Sunny Deol) ‘रामायण’ चित्रपटातील त्याच्या पार्टचं शुटींग सुरु करणार असून एका मुलाखतीमध्ये हा पौराणिक चित्रपट रामायण या महाकाव्याला न्याय देईल असं सनी म्हणाला आहे…(Bollywood Mythological movie)

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारण्याबद्दल सनी देओलने (Sunny Deol) भाष्य केलं असून या चित्रपटासाठी आनंदी तर आहेच पण नर्व्हसही असल्याचं त्याने कबूल केलं आहे… सनी देओलने झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, “हो मी हनुमानाची भूमिका साकारत आहे. हे रोमांचक आणि मजेशीर असेल. मी लवकरच चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे. मी ‘रामायण’च्या शूटिंगसाठी थोडा नर्व्हस आहे आणि मला भीती हीवाटतेय. पण रामायण सारख्या पौराणिक चित्रपटांची हिच एक खासियत असते जिथे तुम्हाला स्वत:ला तयार करावं लागतं आणि कलाकार म्हणून सर्वस्व पणाला लावून भूमिका साकारावी लागते”.(Bollywood news)

पुढे सनी देओल म्हणाला की, ” ‘रामायण’ चित्रपटाची संपूर्ण टीम फार चांगलं काम करत आहे. आणि मला आशा आहे ही हा चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसेल. आजवर ‘रामायणा’वर बरेच प्रोजेक्ट बनले पण ज्यापद्धतीने हा चित्रपट तयार केला जात आहे नक्कीच दिग्दर्शक आणि सगळे कलाकार ‘रामायण’ या महाकाव्याला न्याय नक्कीच देतील आणि प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडेल”.(Entertainment)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological चित्रपट!
=================================
दरम्यान, बॉलिवूडमधला ‘रामायण’ हा पहिला बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचं बजेट ८३५ कोटी इतकं आहे. दोन भागांमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग२०२६मध्ये प्रदर्शित केला जाईल असे सांगण्यात आले आहे. ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल, यश, लारा दत्ता, आदिनाथ कोठारे, विक्रांत मेस्सी, अरुण गोविल, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग,काजल अग्रवाल, अमिताभ बच्चन असे बरेच दिग्गज कलाकार दिसणार आहेत.(Ramayana Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi