Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Bharat Jadhav : स्वातंत्र्यदिनी नाटक प्रेमींसाठी भरत जाधव घेऊन येणार ट्रिपल धमाका!
३० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटविश्वात काम करणारे अभिनेते भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे… ‘मोरुची मावशी’, ‘अस्तित्व’, ‘ऑल द बेस्ट’, ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोरदर पंत’ अशा अनेक अजरामर कलाकृती त्यांनी रसिक प्रेक्षकांना दिल्या… तसेच, नुकताच त्यांचा आता थांबायचं नाय हा चित्रपटही रिलीज झाला होता… मात्र, चित्रपटांपेक्षा रंगभूमीवर अधिक रमणारे भरत जाधव त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहेत…(Marathi Movies 2025)

भरत जाधव स्वातंत्र्यदिनानिमित्त एक नवा रेकॉर्ड करणार बऱ्याच वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी रंगभूमीवर आलं होतं…याच विशेष क्षणाचं औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ऑगस्ट २०२५ रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहाण्याची संधी मिळणार आहे. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या अजरामर नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. या दिवशी सकाळी ‘अस्तित्व’, दुपारी ‘मोरूची मावशी’ तर सायंकाळी ‘पुन्हा सही रे सही’ या तीन नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. विशेष म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा यावेळी ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित राहणार आहेत.

भरत जाधव यांच्या इतर दोन नाटकांबद्दल बोलायचं झालं तर, ‘अस्तित्व’ या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला असून या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाचे आतापर्यंत ८६२ प्रयोग झाले आहेत. आता स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांसाठी भरत जाधव यांचा हा नाट्यप्रयोगांचा ट्रिपल धमाका पर्वणी ठरणार आहे.
================================
हे देखील वाचा: जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे प्रेक्षक भरत जाधव यांच्या वडिलांवर चिडले…
=================================
दरम्यान, भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आजवर त्यांनी, ‘जत्रा’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ असे अनेक चित्रपट केले आहेत. लवकरच पुन्हा एकदा साडे माडे ३ या चित्रपटात ते झळकणार आहेत. (Bharat Jadhav Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi