Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

महाराष्ट्राचं आराध्य दैवत भेटीला येणार; ‘Punha Shivajiraje Bhosle’ चित्रपटाची पहिली झलक रिलीज
२००९ मध्ये संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट आला होता… या चित्रपटाने प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे… आता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कलाकृतीची चर्चा सुरु होती तो ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे… आषाढी एकादशीच्या निमित्ताने या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली…

दरम्यान, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. तसेच, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत महेश नाही तर सिद्धार्थ बोडके दिसणार आहे. त्याच्या सोबत चित्रपटात बालकलाकार त्रिशा ठोसर देखील दिसणार आहे…
दरम्यान, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू येणारं ‘राजं… राजं’ हे बोल काळजाला भिडतात… या चित्रपटातून शिवरायांचं झंझावाती व्यक्तिमत्व आधुनिक काळातील समाज आणि त्यांच्या विचारप्रवाहांना कसं भिडेल यावर अधिक लक्ष देण्यात आलं आहे… चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना महेश मांजरेकर म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून ते एक विचार आहेत. हा विचार आज अधिक आवश्यक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे इतिहासाकडे मागे वळून पाहाणं नाही, तर शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात आजचा अंधार उजळवण्याचा प्रयत्न आहे. समाजात निर्माण झालेल्या निराशा, उदासीनता, आणि दिशाहीनतेच्या गर्तेत आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं गरजेचं आहे. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे..’’
================================
=================================
तसेच, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट भूतकाळात रमणारा नाही, तर आजच्या समाजाला जागं करणारा ठरणार आहे. शिवाजी महाराजांचे विचार आणि तत्वं या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सशक्त माध्यमातून साकारलेला प्रयत्न आहे. त्यामुळे आता २००९ नंतर महेश मांजरेकर छत्रपती शिवाजी महाराजांची बाजू या चित्रपटात कशा पद्धतीने मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(Marathi Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi