जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

Ramayana : साई पल्लवीच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल्या टेलिव्हिजनच्या ‘सीता माता’?
रामायण… म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय… अशातच बॉलिवूडमधला पहिला भव्य आणि बिग बजेट असणारा रामायण चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे सगळीकडेच पौराणिक चित्रपटाची चर्चा आहे… नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम साकारतोय तर साई पल्लवी सीता माता.. मल्टिस्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे… आता एकीकडे चित्रपटाची चर्चा सुरु असताना ३८ वर्षांपूर्वी आलेल्या रामायण मालिकेत सीता माता साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साई पल्लवीच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे… ती माझ्यापेक्षा वेगळी असेल असं एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं आहे… नेमकं दीपिका काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

१९८७ साली आलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ टी.व्ही मालिकेत दीपिका चिखलिया यांनी सीता माता साकरली होती… त्यामुळे ३८ वर्षांनी देखील कोट्यवधी लोकांसाठी त्याच ‘सीता माता’ आहेत. आता रामायण चित्रपटात साई पल्लवी सीता माता साकारणार असून तिच्या अभिनयाबद्दल अमर उजालाशी बोलताना दीपिका यांनी प्रतिक्रिया दिली आहे…सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीला कास्ट करण्याबाबत दीपिका म्हणाल्या की, “साई पल्लवी खूप गुणी अभिनेत्री आहे. मी तिचे मल्याळम चित्रपट पाहिलेत. तिचा अभिनय खूप नॅचरल आहे. मला विश्वास आहे की, ती सीतेची भूमिका चांगली साकारेल. हो, ती माझ्यापेक्षा वेगळी असेल, पण ती तिचं काम चांगले करेल.”

तसेच, ‘रामायण’ चित्रपटाच्या व्हिज्युअल्सबद्दल बोलताना त्या म्हणाला की,”खरं सांगायचं तर, मला व्हिज्युअल इफेक्ट्स चांगले वाटतात. पण, माझं स्वतःचं मत असं आहे की, ‘रामायण’ हे फक्त ग्राफिक्स किंवा तंत्रज्ञान नाहीये. ती भावनांची कथा आहे. टीझर पाहिल्यानंतर मला कथेचा अंदाज आला नाही, पण मला नक्कीच वाटलं की ते खूपच आधुनिक दिसतंय. लायटिंग, रंगांचे टोन्स… सगळं थोडं आधुनिक वाटलं.” तसेच, मोठं बजेट आणि तंत्रज्ञानाच्या काळात रामायणातील खऱ्या भावना हरवल्या जातील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

रामानंद दयासागर यांच्या रामायण मालिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की,”जेव्हा मी ‘रामायण’ केलं तेव्हा तंत्रज्ञान खूप मर्यादित होतं, पण लोकं कथेशी एकरुप होऊन मनापासून जोडले गेले होते. आता मी पाहिलेल्या टीझरमध्ये भव्यता आहे, पण मी वाट पाहतेय की संपूर्ण चित्रपटात त्या भावना आहेत की नाही.” यावेळी त्यांना रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत कसे वाटले? यावर त्या म्हणाल्या, “जेव्हा मी रणबीरला राम म्हणून पाहिलं, तेव्हा मला लगेच अरुण गोविल यांची आठवण झाली. राम याच्या जागी मी कदाचित कधीच दुसऱ्या कोणालाही पाहू शकणार नाही. अरुण गोविलच गेल्या ३५-४० वर्षांपासून आमच्यासाठी प्रभू श्रीराम आहेत.

ओळखीच्या चेहऱ्यांना देव म्हणून स्वीकारतील का? यावर आपलं मत मांडताना त्या म्हणाल्या की, जेव्हा मी ‘रामायण’मध्ये काम केलं, तेव्हा लोकं खरोखरच देवी म्हणून पाहात होते. आजही लोकं मला आणि अरुणजींना राम-सीता मानतात. फरक एवढाच आहे की, जेव्हा आम्ही आलो, तेव्हा आम्ही पूर्णपणे नवे होतो आणि आमचे चेहरेही नवे होते. लोकं आम्हाला त्या रूपात स्वीकारू शकले. पण आजच्या कलाकारांनी आधीच अनेक पात्रं साकारली असल्यामुळे लोकांना त्यांना देव म्हणून स्वीकारणं थोडे कठीण जाऊ शकतं…”
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================
आता दीपिका चिखलिया यांनी ‘रामायण’ चित्रपटाबद्दल इतकं स्पष्टपणे भाष्य केल्यामुळे प्रेक्षकही तुलनात्मक नजरेने कदाचित नितेश तिवारी यांचा रामायण चित्रपट पाहू शकतील. दरम्यान, रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे यांच्या प्रमूख भूमिका असणारा रामायण चित्रपट २०२६ आणि २०२७ मध्ये २ भागांमध्ये रिलीज होणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi