Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !
Dilip Prabhavalkar : गुढ आणि रहस्यांनी भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटाचा टीझर रिलीज
मराठी चित्रपट, नाट्य आणि मालिकाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांचा आज ४ ऑगस्ट रोजी वाढदिवस… आणि याच दिवसाचे औचित्य साधत त्यांच्या आगामी ‘दशावतार’ (Dashavatar) या चित्रपटाचा गुढ टीझर रिलीज करण्यात आला आहे…४० वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजनसृष्टीत कार्यरत असणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांनी प्रत्येक भूमिकेतून स्वत:च वेगळेपण सिद्ध केलं आहे… आणि आता ‘दशावतार’ या चित्रपटात तर ते एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहेत… (Marathi Movies)

दरम्यान, ‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ असावा असं या टिझरमधून लक्षात येत आहे. टीझरमध्ये कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कला आणि त्यांच्याशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे. तसेच, टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये गूढता, भव्यता आणि थरार निर्माण करणारी आहेत. (Marathi Thriller Movies 2025)
================================
=================================
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले असून दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या टिजरमध्ये दिसून आली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून निर्मिती सुजय हांडे यांची आहे… प्रेक्षकांना कोकणातील दशावतार ही कला एका वेगळ्याच रुपात येत्या १२ अनुभवता येणार आहे…(Dashavatar movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi