Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Asha Bhosle यांचे केस खोडकरपणे खेचून किशोर कुमारने गाण्यातील इफेक्ट मिळवला!
किशोर कुमार रेकॉर्डिंगच्या वेळेला खूप गमती करत असते. त्याच्या या गमतीजमतीमुळे गाणी अतिशय मजेदार बनत असत. पण कधी कधी काही संगीतकारांना हा त्याचा मस्करी करणारा स्वभाव ओढायचा नाही. त्यामुळे ते किशोर ओरडायचे. पण किशोर बरोबर काही परिणाम व्हायचा नाही. त्याची दंगामस्ती चालूच असायची. एक खोडकर छोटं मूल किशोर कुमारमध्ये दडलेलं होतं आणि ते वारंवार आपल्या कृतीतून सिद्ध करत होते.

१९५७ साली फिल्मीस्तानचा ‘पेइंग गेस्ट’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट शशीधर मुखर्जी यांनी निर्माण केला होता तर सुबोध मुखर्जी यांनी तो दिग्दर्शित केला होता. चित्रपटात देव आनंद आणि नूतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला सचिन देव बर्मन यांचे संगीत होतं. तर सिनेमातली गाणी मजरूह सुलतानपुर यांनी लिहिली होती . १९५५ साली ‘मुनीमजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा याच टीमचा चित्रपट होता. फक्त त्यात देवची नायिका नलिनी जयवंत होती. ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी होती. त्यातील दोन गाणी युगल स्वरूपातली होती. पहिलं गाणं होतं ‘ओ निगाहे मस्ताना….’ तर दुसरं गाणं होतं ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा…’ ही दोन्ही गाणी किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेली होती.
=========
हे देखील वाचा : हकीकत: भारतातील पहिला युद्धपट, ज्याची जादू अद्याप कायम आहे.
=========
या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस एक गमतीशीर किस्सा घडला होता. पण संगीतकार सचिन देव बर्मन मात्र किशोर कुमार वर रागावले होते. त्यांना रेकॉर्डिंग मध्ये शिस्त लागत असे आणि किशोर कुमारने या गाण्याच्या रेकॉर्डिंग च्या वेळेला धमाल केली होती. हि धमाल सचिनदा यांच्या शिस्तप्रिय मनाला पटली नव्हती. काय होती ती धमाल आणि नेमके सचिनदादा का रागावले होते? ‘पेइंग गेस्ट’ यातील युगलगीत ‘छोड दो आचल…’ या गाण्याचे चे रेकॉर्डिंग होते. देव आनंद स्वतः रेकॉर्डिंगला उपस्थित होते. या गाण्याच्या भरपूर रिहर्सल झाल्या. या गाण्याच्या सुरुवातीला आशा भोसले यांनी ‘ओह…’ हा शब्द अगदी ठसक्यात गायचा होता. पण तिला काही केल्या त्या भावना त्या गाण्यात टाकता येत नव्हत्या.

बऱ्याच रिहर्सल झाल्या. पण सचिनदादा समाधान होत नव्हतं. तेव्हा किशोरने दादा बर्मन यांना सांगितले,” हा सुरुवातीचा पीस बाजूला ठेवून उरलेलं गाणं रेकॉर्ड करून घेवूत.” त्या पध्दतीने तो एक पोर्शन सोडून गाणे रेकॉर्ड केले गेले. नंतर आशा भोसले ला घेवून किशोर कुमार एका कोपऱ्यात गेले आणि किशोरने हळूच तिच्या कानात काहीतरी सांगितले. बर्मनला लांबून हे सर्व दृश्य पाहत होते. त्यांना गायक मंडळींच्या अशी बेशिस्त अजिबात चालत नव्हती. सचिनला दोघांना म्हणाले,” अगर आपकी खुसुर फुसुर बंद हो गयी हो तो रेकॉर्डिंग करते है.” दोघेही तयार झाले. दोघेही गाणे गाण्यासाठी काचेच्या रूममध्ये गेले. त्यावेळी प्रत्येक गायका साठी वेगळी ग्लास रूम नसायची फक्त वेगवेगळे माईक होते. दोघांनी कानाला हेडफोन लावले.
सचिनदांनी बाहेरून आपल्या म्युझिशियनसला इशारा केला आणि गाण्याच्या सुरुवातीच्या पोर्शनचे रेकॉर्डिंग सुरू झालं. त्याच वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये किशोर कुमार बुटका होऊन लहान मुलासारखे चालत चालत आशाच्या मागे गेला आणि तिची वेणी जोरात ओढली. तिच्या तोंडातून ‘ओह…’ शब्द आला किशोर कुमारने आनंदाने सांगितले चालू ठेव आणि गाण्याचा रेकॉर्डिंग सुरू झाले. हा सर्व प्रकार बर्मनदा काचेच्या बाहेर पाहत होते त्यांना काहीच कळत नव्हतं काय चाललंय. गाण्याच्या सुरुवातीच्या पोर्शन चे तर रेकॉर्डिंग झालं दोघेही बाहेर आले. तेव्हा दादा बर्मन यांनी किशोर कुमारला विचारलं,” तू आशा भोसले केस का ओढलेस” मला हे अजिबात आवडलं नाही!” तेव्हा किशोर कुमार म्हणाले,” मी सॉरी म्हणतो म्हणतो पण दादा तुम्ही एकदा गाणं ऐकून तर पहा. मग बोलूया.” लगेच ते गाणं सर्वांनी ऐकलं.
==========
हे देखील वाचा : बॉबी सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी नशीब बलवत्तर म्हणून प्राण यांचे प्राण वाचले!
==========
आशा भोसले यांनी जे ठसक्यात ‘ओह…’ गायचं होतं ते इथे परफेक्ट जमलं होतं. आणि ते जमवलं होतं किशोर कुमारने मागून जाऊन तिची वेणी केस उडल्यामुळे बरमंदा देखील किशोर कुमारच्या या आयडीया ने! सर्व जण खूष झाले. दादा बर्मन यांनी हसत एक मसाला पान तोंडात सरकवले आणि किशोरला दाद दिली. अशा पद्धतीने ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा….’ या गाण्याचे रेकॉर्डिंग पार पडलं. आज साठ-सत्तर वर्षानंतर देखील या युगलगीताला ऑर्केस्ट्रा मधून मागणी होते हे त्या गाण्याचे आणि कलाकारांचे मोठे यश आहे.