Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Om Shanti Om : अर्जून रामपाल नाही तर ‘या’ अभिनेत्याला ऑफर झालेली मुकेश मेहराची भूमिका
दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा बॉलिवूडमधला डेब्यु चित्रपट ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om movie) आजही प्रेक्षकांच्या खास लक्षात आहे… एक तर पहिलाच बॉलिवबडचा ब्रेक तोही थेट शाहरुख खान सोबत आणि त्यात फराह खान हिचं दिग्दर्शन… त्यामुळे नक्कीच दीपिकासाठी ही फार मोठी संधी होती आणि त्या संधीचं तिने सोनंदेखील केलं होतंच… जितकी या चित्रपटाची कथा आणि प्रत्येक पात्र गाजली… तितकाच चित्रपटातील खलनायक प्रेक्षकांनाही विशेष आवडला… अर्जून रामपाल (Arjun Rampal) याने ‘ओम शांती ओम’ चित्रपटात मुकेश मेहरा ही भूमिका केली होती… मात्र, तुम्हाला माहित आहे का अर्जूनच्या आधी एका वेगळ्याच अभिनेत्याला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती… कोण होता तो अभिनेता जाणून घेऊयात….(Deepika Padukone movies)

फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता… यात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका होती. प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटातील खलनायक मुकेश मेहरा या व्यक्तिरेखेचीही खूप चर्चा झाली होती… तर, ही भूमिका अर्जून आधी अभिनेता विवेक ओबेरॉयला (Vivek Oberoi) ऑफर करण्यात आली होती…. खरं तर, या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी बऱ्याच कलाकारांनी नकार दिला होता… याबद्दल स्वत: फराह खानने याबाबत खुलासा केला होता. ती म्हणाली होती की, “मुकेश मेहरा यांच्या भूमिकेसाठी कास्टिंग करणं सर्वात कठीण काम होतं,कारण ती पूर्णपणे नकारात्मक भूमिका होती.”(Entertainment News)

दरम्यान, स्वत: विवेक ओबेरॉयने ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील मुकेश मेहराची ऑफर नाकारल्याचं सांगितंल होतं. त्याने शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘ओम शांती ओम’ करण्याऐवजी ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटाला पसंती दिली होती… आता मुकेश मेहराची भूमिका कोण करणार असा प्रश्न उद्भवला होता… चित्रपटाच्या शुटींगला जेमतेम एक आठवडा उरला होता आणि या चित्रपटात मुकेशच्या स्वभावाला साजेसी कलाकार फराह खानला सापडत नव्हता… त्यानंतर शाहरुखच्या घरी न्यु इयर पार्टीत फराह अर्जुन रामपालला भेटली… आणि तेव्हा तिथेच शाहरुखच्या घरातील बाथरुममध्ये मुकेश मेहरा या भूमिकेसाठी अर्जुन रामपालचं कास्टिंग सेशन झालं होतं आणि अखेर ‘ओम शांती ओम’चा खलनायक दिग्दर्शिकेला सापडला….
====================================
====================================
दरम्यान, पहिल्याच पदार्पणातील दीपिका पादूकोण हिचा ‘ओम शांती ओम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता… २००७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला होता… ओम शांती ओम चित्रपटाने वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन १५० कोटी आणि देशात ७९.५० कोटींची कमाई केली होती… या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) ते धर्मेंद्र अशा बऱ्याच दिग्गज कलाकारांनी Om Shanti Om oया गाण्यात गेस्ट अपिअरन्स दिला होता…(Bollywood movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi