
Jagjit Singh : ‘चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन से देस जहाँ तुम चले गये…. ‘
कलावंतासाठी कधी कधी त्यांनी स्वतःच गायलेली गाणी ही त्यांच्या हळव्या दुःखाला गोंजारणारी असतात. हे दुःख, या यातना त्यांचं काळीज पिळवटून टाकणाऱ्या असतात. पण तरीही त्या भावना तो कलावंत आयुष्यभर जपत असतो. यातून तो दु:खाच्या ओझ्या तून रिता होता असतो की पुन्हा पुन्हा भरला जात असतो माहित नाही पण हे हळवं दु:ख तो कायम उराशी बाळगत असतो. ज्येष्ठ गझल गायक जगजीत सिंग यांच्या एका गजले सोबतच्या त्यांच्या भावना अशाच राहिल्या होत्या. ही गझल प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून गात असत. मनावर असलेल्या दुःखाचे ओझं या निमित्ताने काही काळ तरी हलक होत असायचं. हि गझल गाताना ते आतून रडत असत. पण पुन्हा पुन्हा. आळवून ते गात असत. रसिकांनी या गझलेला उदंड प्रेम दिलं. कोणती होती ती गझल आणि काय होता तो नेमका किस्सा?

गायक कलाकार जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांची साठच्या दशकामध्ये चांगली मैत्री होती. दोघेही उत्तम गझल गायक होते. त्यावेळी चित्रा या विवाहित होत्या परंतु त्यांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले नव्हते. १९६९ साली त्यांनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन जगजीत सिंह यांच्यासोबत लग्न केले आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला. १९७० साली त्यांनी विवेक सिंग या आपल्या पुत्ररत्नाला जन्म दिला. सत्तर च्या दशकात जगजीत आणि चित्रा यांनी गझलच्या दुनियेमध्ये प्रचंड मोठे नाव कमावले. नॉन फिल्मी म्युझिक मध्ये त्यावेळी ते टॉप वर होते. 1976 साली त्यांचा The Unforgettable नावाचा एक अल्बम रिलीज झाला; आणि हे नाव जगभर पोचले.
‘बात निकलेगी तो दूर तलक जायेगी…’ हि गजल प्रचंड गाजली. त्यानंतर या दोघांनी गझल गायकीसाठी संपूर्ण जगभरात दौरे केले. वो कागज की कश्ती वो बारीश का पानी, सरकती जाये ये रुख से नकाब,कल चौदहवी की रात थी, ’अपनी आग को तो जिंदा रखना’,’सुना था की वो आयेंगे अंजुमन’,’दुनिया जिसे कहते है’,’ मै भूल जाऊ सील सिले’,मुझको यकीन है’… मिडल ईस्ट, पाकिस्तान इथे तर त्यांना कायम मागणी असायची. या काळात यांच्या गझल्स नी इथल्या तरुणाईला वेडावून टाकले होते. ऐंशी च्या दशकामध्ये जगजितसिंह यांनी चित्रपटाला संगीत द्यायला आणि गायला सुरुवार केली. ‘प्रेमगीत’ (१९८१) या चित्रपटातील ‘होटो से छु लो तुम मेरा गीत अमर कर दो…’ या गाण्याला तर संपूर्ण देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळाली.
================================
हे देखील वाचा : Aarti Movie : कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी बहारों की मंझील राही……
=================================
फिल्म फेअर पुरस्कारासाठी हे गीत नामांकित झाले. यानंतर महेश भट यांच्या ‘अर्थ’(1983) या चित्रपटातील गझलांनी पुन्हा एकदा प्रचंड मोठी लोकप्रियता मिळविली. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, झुकी झुकी सी नजर .. या काळात त्यांचे नॉन फिल्मी गझल अल्बम्स येतच होते. दिवसेंदिवस या जोडीची लोकप्रियता वाढत होती. सारं कसं छान चालू होतं. ‘जमाना बडे शौक से सून रहा था…. अशीच अवस्था होती. पण २७ जुलै १९९० च्या रात्री अशी घटना घडली की त्याच्या सुरील्या संगीताच्या मैफलींमध्ये अनाकलनीय असा भेसूर ब्रेक आला आणि पुढे हि काळ रात्र त्यांचे उभे आयुष्य काळोखात ढकलून गेली. या रात्री त्यांचा १८ वर्षाचा मुलगा विवेक सिंग आपल्या दोन मित्रांसोबत लॉंग ड्राईव्ह ला गेला होता.
रात्री दोन वाजता त्यांच्या कारने एका ट्रकला धडक दिली आणि हा अपघात इतका भयानक होता की त्यामध्ये विवेक सिंगचा जागीच मृत्यू झाला. (याच गाडीत त्याच्यासोबत त्याचा मित्र साईराज बहुतुले देखील होता. साईराज त्यावेळी नुकताच क्रिकेट खेळायला लागला होता. त्याला देखील या अपघातात मोठी दुखापत झाली. त्याच्या पायात रॉड टाकावा लागला. त्याचे क्रिकेट करियर संपते की काय असे वाटू लागले. पण नंतर त्याने स्वतःला सावरले आणि आणि पुढे भारतीय क्रिकेट संघात त्याचा समावेश झाला. या अपघाताच्या वेळी त्यांचा आणखी एक मित्र देखील या गाडीत होता तो देखील थोडक्यात बचावला.)

जगजीत आणि चित्रा दोघेही या अनपेक्षित आघाता नंतर प्रचंड खचून गेले. त्यानंतर एक वर्षभर जगजीत सिंह ने एकही गाणे गायले नाही. चित्रासिंग ने तर असे जाहीर केलं की मुलाच्या विरहानतर मी आता एक ओळ देखील गाऊ शकणार नाही. जगजीत ने मात्र स्वतःला सावरले आणि पुन्हा एकदा हळूहळू संगीताच्या दुनियेत ते कार्यरत झाले. पण मुलाची आठवण ते विसरू शकत नव्हते. ते सांगतात ,” त्या काळात रोज रात्री मी आणि चित्रा दोन दोन तास मुलाच्या आठवणीने आणि त्याचा फोटो छातीशी धरून रात्रभर रडत असायचो ” हे दु:ख असं होतं ज्याला अंत नव्हता. शेवट नव्हता. पण याच काळात एक घटना अशी घडली कि ज्याने जगजीत सिंग ला आपल्या दु:खा साठी एक मार्ग सापडला. मनातल्या कोंडलेल्या वेदना बाहेर टाकायचं माध्यम मिळाले. दिग्दर्शिका तनुजा चंद्र यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘दुश्मन’. संजय दत्त, काजोल आणि आशुतोष राणा यांच्या या चित्रपटात प्रमुख होत्या.
या चित्रपटात एक गझल गाण्यासाठी जगजित सिंहला पाचरण करण्यात आले. गझल लिहिलेला कागद जेव्हा त्यांच्या हाती आला त्यावेळेला त्यांना शॉक बसला. कारण त्यातील ओळी त्यांना स्वतःला को रिलेट होतील अशा होत्या. आनंद बक्षी यांच्या ओळी होत्या ‘चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन से देस जहाँ तुम चले गये…. ‘ हा कागद पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या! त्यांच्या मुलाचा चेहरा सारखा त्यांच्या डोळ्यापुढे येऊ लागला. तो कागद घेऊन जगजीत घरी गेले आणि रात्रभर त्याचा फोटो उशाशी घेऊन त्या गझल च्या ओळी गुणगुणू लागले. रेकॉर्डिंगच्या ओळी देखील त्यांच्या अवस्था हीच होती. संगीतकार उत्तम सिंग यांनी अत्यंत भावस्पर्शी संगीतात त्यांनी ही गझल रेकॉर्ड केली. चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट झाला. या गजलेला संपूर्ण देशात प्रचंड मागणी आली.

जगजीत सिंह यांना आता प्रत्येक कार्यक्रमात ही गझल गाणं बंधनकारक होऊ लागलं. जगजीत सिंह सांगतात की,” ज्या ज्या वेळेला मी गझल गायले त्या त्या वेळेला मी आतून भरपूर रडलो. माझं दुःख या निमित्ताने थोडा हलक व्हायचं असं वाटायचं. यानिमित्त माझ्या मुलाला सांगितिक श्रद्धांजली वाहत होतो.” खरोखरच ही गझल अगदी काळजाला टच करणारी आहे. जगजीत सिंह या मुलाखतीत सांगतात की,” आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख काय असेल तर आपल्या पित्याच्या खांद्यावर मुलाचं कलेवर! हे पहाडा एवढं दुःख आमच्या दोघांवर कोसळलं!
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
=================================
चित्राचं तर संपूर्ण कोसळून गेली. मला मात्र व्यवहारी जगात जगाव लागण्यासाठी गावं लागलं!” 10 ऑक्टोबर 2011 या दिवशी जगजीत सिंह यांचा ब्रेन हॅमरेज निधन झालं. चित्रा सिंग आता एकट्या पडल्या कारण पती पूर्वीच त्यांच्या मुलीने आपलं जीवन संपवून टाकले होते. आधी पुत्र मग कन्या आणि नंतर पती यांच्या निधनाने चित्रा सिंग पुरत्या कोलमडून गेल्या. आज चित्रासिंग वयाच्या 85 व्या वर्षी कलकत्त्याला आपल्या नातवा सोबत राहतात. मागच्या 35 वर्षापासून त्यांनी एकही गाणं गायलं नाही मुलाच्या दुःखाचा ओरखडा त्यांचं आयुष्य पुन्हा बदलवू शकला नाही! अमीर, उमराव आणि इलाईट क्लास पुरती मर्यादित असलेली गजल मासेस पर्यंत पोचविण्याचे महान काम या जगजीत- चित्रा यांनी केले. त्यामुळेच रसिक त्यांना ‘King and Queen of gajhals’ असेच प्रेमाने म्हणतात.