‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Shammi Kapoor आणि राजकुमार या दोघांनी जेव्हा रफींच्या स्वराचा हट्ट धरला होता!
बॉलीवूड मधील सिनेमाच्या मेकिंगच्या त्या वेळच्या गमती जमती आत्ता वाचल्या तरी खूप गम्मत वाटते. आपण जेव्हा जुन्या काळातली मासिके, कात्रणं, जुन्या काळातील काही संदर्भलेख वाचली तर त्या काळात देखील एकमेकांवर कुरघोडी करण्याचे उद्योग व्यवस्थित चालू असायचे याची जाणीव होते. आयडेंटिटी क्रायसेस हि एक संकल्पना आहे. आपल्या अस्तित्वाची दखल बाबत सर्व जण दक्ष असतात. साठच्या दशकात एकदा एका चित्रपटाच्या वेळी त्या सिनेमातील दोन कलाकार मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणे आपल्यावर चित्रित व्हावे यासाठी अडून बसले होते.

निर्माता आणि दिग्दर्शकांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला. हे कलाकार होते शम्मी कपूर आणि राजकुमार. दोघेही दिग्गज अभिनेते. त्यामुळे त्यांच्या दोघातील तणावामुळे चित्रपट बंद पडतो की काय अशी शक्यता निर्माण झाली. पण मोठ्या शिताफीन त्यांनी हा पेच मिटवला गेला. प्रश्न लवकर सुटला आणि हा सिनेमा प्रदर्शित झाला. सुपर डुपर हिट झाला. पण या कटुतेमुळे या दोन अभिनेत्यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केले नाही! कोणता होता तो चित्रपट आणि कोणता होतं ते गाणं ज्यामुळे या दोन कलाकारांमध्ये वाद निर्माण झाला होता?

1959 साली या एफ सी मेहरा यांच्या इगल फिल्म्स बॅनर चा ‘उजाला’ हा चित्रपट तयार झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शक होते नरेंद्र सैगल. या चित्रपटामध्ये शम्मी कपूर, राजकुमार, माला सिन्हा, कुम कुम. लीला चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेली होती; तर संगीत शंकर जय किशन यांचे होते. दोन मित्रांची कहाणी या चित्रपटामध्ये दाखवली होती. शेवटी सत्य प्रामाणिकपणा चाच विजय होतो असे टिपिकल कथानक होते. चित्रपटात राजकुमार यांची भूमिका निगेटिव्ह शेडची होती. राजकुमार आणि शम्मी कपूर हे पहिल्यांदाच एका चित्रपटात काम करत होते.
================================
हे देखील वाचा : Shashi Kapoor यांना राज कपूर यांनी कोणता मोलाचा सल्ला दिला होता?
=================================
या चित्रपटांमध्ये शम्मी कपूर साठी प्रामुख्याने मन्नाडे आणि मुकेश यांनी स्वर दिला होता. त्यातली सगळी गाणी लोकप्रिय झाली होती. मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘झुमता मौसम मस्त महिना चांद सी गोरी एक हसीना याल्ला याल्ला दिल ले गई…’ मुकेश आणि लताच्या स्वरातील ‘दुनियावालो से दूर जलने वालों से दूर…’ हे युगलगीत त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले. मन्नाडे यांच्या स्वरातील ‘अब कहा जाये हम, सुरज जरा आ पास आ… ही गाणी सुद्धा चांगली जमून आली होती. या सिनेमांमध्ये लता मंगेशकर यांची दोन सोलो गाणी अफाट गाजली. ‘तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया’ आणि ‘ओ मोरा नादान बालमा न जाने दिल की बात’ हि गाणी अफाट गाजली. एकूणच ‘उजाला’ हा चित्रपट म्हणजे कम्प्लीट म्युझिकल पॅकेज होता!

चित्रपटाचं जवळपास 70 टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. तेव्हा अभिनेता राजकुमार यांच्या लक्षात आलं की या सिनेमात आपल्यावर एकही गाणं चित्रीत होणार नाही. त्याने ताबडतोब निर्माते दिग्दर्शकांशी संपर्क साधला आणि सांगितलं की या सिनेमात मला एक तरी गाणं पाहिजे. त्यावर दिग्दर्शकाचे म्हणणे असे होते की,” आपली या सिनेमातील भूमिका पाहता आपल्याला गाणं देता येणार नाही.” त्यावर राजकुमार ने चित्रपटाच्या सेटवर येणं बंद केलं. आता मात्र सगळ्यांचे धाबे दणाणले. यावर सोल्युशन काढायचे ठरवले.

त्यांनी एक सिच्युएशन क्रिएट केली ज्यामध्ये दोन मित्रांचे एक गाणं घ्यायचं ठरवलं. हे गाणं शम्मी कपूर आणि राजकुमार यांच्यावर चित्रित होणार होता. शैलेंद्र यांनी हे गाणं लिहिलं ‘यारो सुरत हमारी पे मत जाओ..’ हे गाणे गायले होते मुकेश आणि रफी यांनी.आणि चित्रपटात हे गाणं या दोघांवर चित्रित करायचा ठरवलं पण त्यावेळी पुन्हा वाद झाला. हे गाणं रफी आणि मुकेश यांनी गायलं होतं यातील रफीने गायलेलं पार्ट राजकुमारला वाटला आपल्यावर चित्रित व्हावा तर शम्मी कपूर म्हणाला “रफी तर माझा स्वर आहे. त्यामुळे हे गाणं माझ्यावर चित्रित होईल!”
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : ‘आ चल के तुझे मैं लेके चलू…’ गाण्याचा किस्सा
============
पुन्हा चित्रपटाचे शूटिंग ठप्प झालं. राजकुमारला हर प्रकारे समजावण्यात आलं की “ रफी चा स्वर खरोखरच शम्मी वर सूट होतो.” आणि शेवटी कसाबसा ते राजकुमार तयार झाला. मुकेशने गायलेला पार्ट राजकुमार वर चित्रीत झाला. राजकुमार मात्र निर्माता दिग्दर्शकांच्या या कृतीने काहीसा नाराज झाला. शम्मी कपूरने देखील हट्ट झाल्यमुळे आपल्याला गाणं मिळालं नाही याची बोच त्याला कायम राहिली आणि त्याने आयुष्यात पुन्हा कधी शम्मी कपूर सोबत काम केले नाही! या दोघांचा हा केवळ एकमेव चित्रपट ठरला.