यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

Sara Ali Khan पुन्हा एकदा पोहोचली केदारनाथाच्या चरणी!
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, मग यात कलाकार देखील कसे मागे पडतील? बॅक टू बॅक चित्रपटांचं शुटींग केल्यानंतर बरेच कलाकार एकटे किंवा आपल्या कुटुंबासोबत देशात किंवा परदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसतात… अशातच आता सोशल मिडियावर सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) हिचे केदारनाथचे पोटो व्हायरल झाले आहेत…

खरं तर, सारा अली खान हिचा बॉलिवूडमधील पहिला डेब्यु चित्रपट होता ‘केदारनाथ’ (Krdarnath Movie) जो २०१८ मध्ये रिलीज झाला होता.. सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत ती चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती… आता कदाचित त्या चित्रपटामुळे साराचं केदारनाथची एक वेगळंच नातं निर्माण झालं आहे असं वाटतं… सारा अली खान पुन्हा एकदा महादेवाच्या भेटीला केदारनाथला गेली असून तिच्या तेथील फोटोंवर लोकांनी कौतुक केलं आहे… (Entertainment News)

साराने सोशल मिडियावर केदारनाथचे फोटो शेअर करत असं लिहिलं आहे की, “जगातील ही एकमेव जागा आहे जी पूर्णपणे आपली वाटते आणि तरीही प्रत्येकवेळी मला आश्चर्यचकित करते. माझ्या जवळ सगळं काही आहे. मला हे सगळं देण्यासाठी आणि मला यशस्वी बनवण्यासाठी धन्यवाद…मी जी काही आहे ती तुमच्यामुळे आहे… जय श्री केदारनाथ…” (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Spirit Movie : प्रभासच्या चित्रपटाचा ऑडियो टीझर रिलीज; विवेक ऑबरॉयचंही नशीब पालटणार…
================================
दरम्यान, केवळ केदारनाथच नाही तर भारतातील बऱ्याच धार्मिक स्थळांना सारा अली खान भेटी देत असते… मग यात ज्योतिर्लिंग असो किंवा शिर्डीचं साई बाबांचं मंदिर असो… सारा सर्व धार्मिक स्थळांवर जात असते… आता साराच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, नुकत्याच ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटात ती दिसली होती… या व्यतिरिक्त ‘स्काय फोर्स’, ‘मर्डर मुबारक’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘गॅसलाईट’, ‘सिंबा’ अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांत ती झळकली आहे.. लवकरच आयुष्यमान खुराना सोबत सारा ‘पती, पत्नी और वो २’ मध्ये दिसणार आहे… (Sara Ali Khan Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi