Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

तब्बल १६ वर्षे लागली होती Meena Kumari च्या ‘पाकिजा’ला बनायला!
चित्रपटाचा मुहूर्त झाल्यानंतर तब्बल १६ वर्षानंतर प्रदर्शित झालेला सिनेमा कोणता असा जर प्रश्न विचारला तर एकच उत्तर समोर येईल ते म्हणजे कमाल अमरोही यांचा ‘पाकीजा’. या चित्रपटाचा मुहूर्त १६ जुलै १९५६ या दिवशी झाला होता आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला ४ फेब्रुवारी १९७२ या दिवशी! दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा ‘पाकीजा’ हा चित्रपट भारतीय चित्रपटातील एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी भन्नाट आहे. त्यापेक्षा भन्नाट आहे यातील गाण्याच्या चित्रीकरणाची कहाणी! या चित्रपटातील दोन गाण्यांच्या चित्रीकरणात नायिका मीनाकुमारी चक्क गायब होती. तिच्या ऐवजी तिच्या बॉडी डबलने ह्या गाण्याची शूट केले होते. असे का करावे लागले होते? आणि तब्बल १६ वर्षे का लागले हा चित्रपट बनायला? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. (Meena Kumari Movies)

दिग्दर्शक कमाल अमरोही हे चित्रपटसृष्टीत अतिशय परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जायचे. प्रत्येक शॉट परिपूर्ण कसा होईल यासाठी त्यांची धडपड चालू असायची. त्यामुळे रिटेक वर रिटेक ते घेत राहायचे. एकदा, दोनदा, दहादा, अगदी पन्नास वेळा ते एखादा शॉट घ्यायचे! मनाचे समाधान होईपर्यंत ते मागे हटत नसायचे. त्यांच्या अशा रिटेक्स मुळे त्या काळात कच्च्या फिल्म्स चा खर्च खूप वाढायचा कारण तेव्हा डिजिटल कॅमेरा नव्हते. कमाल अमरोही यांच्या मनात मीनाकुमाराला घेऊन एक भव्य दिव्य चित्रपट काढण्याचं स्वप्न होतं. ज्याप्रमाणे शहाजहानने आपल्या बेगम मुमतासाठी ताजमहालाची निर्मिती केली तसंच काहीच स्वप्न कमाल अमरोही यांनी आपली बेगम मीनाकुमारीसाठी पाहिलं होतं आणि त्यातूनच ‘पाकीजा’ या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. ‘पाकिजा’ म्हणजे पवित्र. मीना कुमारी मध्ये ते ‘पाकिजा’ पाहात होते. १६ जुलै १९५६ या दिवशी चित्रपटाचा मुहूर्त झाला. हा सिनेमा लखनऊच्या तवायफच्या जीवनावर असल्यामुळे चित्रपटात गीत संगीताला खूप मोठा वाव होता. चित्रपटात चे संगीत गुलाम मोहम्मद यांनी दिले होते. तर गाणी मजरूह सुलतानपुरी,कैफ भोपाली कमाल अमरोही यांनी लिहिली होती.
================================
हे देखील वाचा : Meena Kumari : जेव्हा एका डाकूने चाकूने मीना कुमारीचा ऑटोग्राफ घेतला!
================================
चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. तो काळ कृष्ण धवल रंगात शूटिंग करण्याचा होता. पण साठच्या दशकाच्या प्रारंभी भारतात कलर फिल्म्सच्या सुरुवात झाली. कमाल अमरोही यांना आपला चित्रपट भव्य दिव्य बनवायचा होता. त्यामुळे त्यांनी जवळपास ४०% बनलेला सिनेमाचे शूटिंग स्क्रॅप करून नव्याने पुन्हा कलर मध्ये चित्रपट शूट करायला सुरुवात केली. यामध्ये त्यांचा प्रचंड खर्च झाला. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केलेले शूट नष्ट करावे लागेल. पुन्हा एक ब्रेक असा आला की हॉलीवुड मध्ये त्यावेळी कलर सिनेमास्कोप तंत्र विकसित झाले होते कमाल अमरोही यांना हे तंत्र हवे होते. यामध्ये चित्रपट जास्त मोठा दिसतो. ही भव्य दिव्यता त्यांना हवीच होती. त्यामुळे त्यांनी हॉलिवूडच्या एमजीएम स्टुडिओ मधून कलर सिनेमास्कोप लेन्स मागवल्या आणि त्यातून त्यांनी चित्रपटाची शूटिंग पुन्हा एकदा नव्याने सुरू केले. आता तिसऱ्यांदा शूटिंग सुरू झाले.त्या काळात संपर्क यंत्रणा आणि दळण वळणाची साधने फारशी उपलब्ध नव्हती. त्या मुळे हॉलीवूड हून लेन्स मागवणे त्यावर शूटिंग पुन्हा सुरु करणे यात वेळ आणि पैसा अमाप जात होता. सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर Josef Wirsching होते.’पाकीजा’ हा भारतातील पहिला कलर सिनेमास्कोप चित्रपट ठरला!

त्यानंतर खरा ट्विस्ट यायचा बाकी होता. १९६४ साली मीनाकुमारी आणि कमाल अमरोही यांच्यातील वैवाहिक जीवनात मतभेद सुरू झाले आणि दोघांनी सेपरेट व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे ‘पाकिजा’ चित्रपटाचे शूटिंग कम्प्लीटली थांबले. मीनाकुमारी दुःखाच्या सागरात बुडाली आणि तिने ‘एकच प्याला’ जवळ केला. तिचे पिणे एवढे वाढले की तिला लिव्हर सिरोसिसचा त्रास सुरू झाला. यामध्ये पाच वर्ष अशीच निघून गेली. ‘पाकिजा’चे शूटिंग पूर्णपणे थांबले होते. १९६८ साली पाकीजाचे संगीतकार गुलाम मोहम्मद आणि सिनेमॅटोग्राफर Josef Wirsching यांचे देखील निधन झाले. १९६९ साली सुनील दत्त आणि नर्गिस यांची एन्ट्री झाली आणि त्यांनी बघितले की ‘पाकीजा’ चे जवळपास ८०% शूटिंग पूर्ण झालेले आहे.

इतकी चांगली कलाकृती लोकांपुढे यायलाच हवी म्हणून त्यांनी कमाल अमरोही आणि मीनाकुमारी यांच्यात मध्यस्थी करायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांची मिटींग झाली आणि चित्रपटाचे उरलेले शूटिंग लवकर पूर्ण करण्याचा निर्णय झाला. 1969 मध्ये पुन्हा एकदा सिनेमाचे शूटिंग सुरू झाले पण आता मीनाकुमारी तब्येत खूपच तोळामासा झाली होती. तिला आता थोडे जरी श्रम केले तरी धाप लागत होते. डॉक्टर देखील तिला जास्त काम करण्यापासून परावृत्त करत होते. त्यामुळे या चित्रपटातील दोन गाणी मीनाकुमारी च्या ऐवजी तिची बॉडी डबल पद्मा खन्ना हिच्यावर चित्रित करण्यात आली. ही गाणी होती ‘तीरे नजर देखेंगे’ आणि ‘चलो दिलदार चलो चाँद के पार चलो…’ या दोन्ही गाण्यांमध्ये मीनाकुमारीचे क्लोज अप शॉटस फक्त घेतले आहेत. बाकी नृत्य करताना आणि लॉन्ग शॉट मध्ये सगळीकडे पद्मा खन्ना आहे.
================================
हे देखील वाचा : मीना कुमारी: बॉलिवूडच्या ट्रॅजिडी क्वीनची एक सुखद आठवण
================================
संगीतकार गुलाम मोहम्मद यांचे निधन झाल्याने या चित्रपटाचे पार्श्वसंगीत करण्याची जबाबदारी संगीतकार नौशाद यांनी उचलली. गुलाम मोहम्मद यांनी स्वरबध्द केलेली नऊ गाणी या चित्रपटात वापरली आणि उरलेली सात गाणी रेकॉर्ड कंपनी HMV ने ‘पाकीजा रंगबिरंग’ या नावाने १९७८ साली प्रदर्शित केली. सर्व अडथळ्यांना पार करत हा चित्रपट पूर्ण झाला आणि ४ फेब्रुवारी १९७२ या दिवशी प्रदर्शित झाला. सुरुवातीला चित्रपटाचे प्रेक्षकांनी थंडे स्वागत केले कारण काळ बदलला होता संगीताची भाषा बदलली होती. पण ३१ मार्च १९७२ या दिवशी मीनाकुमारी निधन झाले आणि या चित्रपटाला तोबा गर्दी झाली. मराठा मंदिर या थियेटर मध्ये या चित्रपटाने गोल्डन ज्युबली साजरी केली.