Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: डेंग्यूमुळे घराबाहेर गेलेला Pranit More परत येणार का? कॉमेडियनच्या टीमकडून हेल्थ अपडेट शेअर
Bigg Boss 19 या नवीन सीझन मध्ये प्रसिद्ध कॉमेडियन प्रणीत मोरेला (Pranit More) घरातून बाहेर जाव लागल हे फॅन्ससाठी एक मोठा धक्का आणणारं होतं. प्रणीत मोरेच्या घरातून बाहेर जाण्याचं कारण म्हणजे त्याला डेंग्यू झाला आहे. ज्यामुळे त्याला उपचार घेण्यासाठी घर सोडावं लागलं. सलमान खानने याबद्दल खुलासा केला आणि त्याचा हेल्थचं कारण देत त्याला घराबाहेर यायला सांगितलं. ज्यामुळे सर्वजण थक्क झाले होते. प्रणीत मोरेला हक्काचं स्थान मिळालं होतं घरात, आणि त्याची अनुपस्थिती घरातील वातावरणावर निश्चितच प्रभावटाकणारी ठरत आहे. प्रणीतच्या अचानक बाहेर जाण्याने घरातले त्याचे मित्र खूपच निराश झाले होते. त्याच्या जाण्याने त्याने घरातील इतर सदस्यांना एक मोठा धक्का दिला. त्याच्या मित्रांनी कॅमेऱ्यांसमोर त्याला लवकर बरा होऊन परत येण्याची विनंती ही केली. त्याचं हास्य आणि विनोदी शैली घरातल्या वातावरणात एक नवा रंग भरत होती, आणि त्याच्या अनुपस्थितीने घरातली जोडी आणि मजा कमी झाली होती.(Bigg Boss 19)

पण आता प्रणीत मोरेच्या टीमने त्याच्या स्वास्थ्य बाबत एक हेल्थ अपडेट जारी केलं, ज्यामुळे चाहत्यांना काही दिलासा मिळाला आहे. या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं की प्रणित मोरेची तब्येत सुधारत आहे, आणि तो मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्याच्या आणि “बिग बॉस” मध्ये परत येण्याच्या आशेने प्रार्थना केली आहे. घराबाहेर जाण्याआधी प्रणीतला डॉक्टरांनी तपासलं आणि त्याला उपचार घेण्यासाठी बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

प्रणीत मोरेच्या अचानक बाहेर जाण्यामुळे घरात दुसऱ्या नॉमिनेशन प्रक्रिया ही आता सुरू झाली. यात ५ सदस्य नॉमिनेट करण्यात आले ज्यात फरहाना भट्ट, गौरव खन्ना, नीलम गिरी, अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांचा समावेश आहे. यामुळे घरात आणखी तणाव निर्माण झाला आणि पुढील एपिसोड्समध्ये त्याचा परिणाम दिसणार आहे.(Bigg Boss 19)
===============================
हे देखील वाचा: Bigg Boss 19 मध्ये ‘प्रणित-मालती’ची नवी लव्ह स्टोरी? सोशल मिडीयावर कमेंट्स चा पाऊस !
===============================
प्रणीत मोरेच्या घरी परत येण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्या चाहत्यांना आशा आहे की, तो लवकरच स्वस्थ होऊन घरात पुनरागमन करेल. त्याच्या विनोदी शैलीतून शो मध्ये एक खास रंग होता, आणि तो परत येईल, तर शोमध्ये एक नवा उत्साह निर्माण होईल यात शंका नाही.