Varanasi : एस.एस. राजामौलींच्या आगामी चित्रपटाचं टायटल कन्फर्म! ३००० कोटी

“अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत, कारण…”; Suneil Shetty ने सांगितला ‘तो’ किस्सा!
बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या चित्रपटांसोबतच सामाजिक कार्यांमुळे देखील कायम चर्चेत असतो… ‘धडकन’, ‘हेरा फेरी’, ‘शूटआऊट अॅट लोखंडवाला’, ‘बॉर्डर’ असे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सुनील शेट्टी याने नुकताच एक महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा खास किस्सा सांगितला… त्याने असं म्हटलं होतं की, “शुटींगच्यावेळी बच्चन साहेब आमच्यासोबत जेवायला बसत नव्हते”… आता नेमकं सुनील शेट्टी काय म्हणाला आहे जाणून घेऊयात…
सुनील शेट्टीवे अमिताभ बच्चन यांच्यासोबत बरेच चित्रपट केले… त्यापैकी २००२ साली आलेल्या संजय गुप्ता दिग्दर्शित ‘कांटे’ (Kaante) या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सुनीलने शेअर केला… या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, लकी अली आणि महेश मांजरेकर यांसारखे अनेक मोठे कलाकार होते. (Suneil Shetty)
सुनील शेट्टी म्हणाला की, “माझं आणि अमिताभ बच्चन यांचं नातं खूप खास आहे. माझ्यासाठी ते नेहमीच आयडॉल राहिले आहेत. ते केवळ पडद्यावर जसे दिसतात, म्हणूनच नव्हे, तर ‘कांटे’च्या शूटिंगदरम्यान लॉस एंजेलिसमध्ये मी बिग बींविषयी जे पाहिलं, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा माझा आदर आणखी वाढला.. ‘कांटे’च्या सेटवर दररोज दुपारी सर्व कलाकार एकत्र लंच करायचे. सेटवर विविध पदार्थांची व्यवस्था केलेली असायची आणि सर्व टीम एकत्र जेवण करायची. मात्र, अमिताभ बच्चन कायम आमच्यासोबत जेवण्यास टाळाटाळ करायचे. आम्हाला वाटायचं की, त्यांना त्यांच्या व्हॅनमध्ये बसून आराम करायचा असेल म्हणून ते आमच्यासोबत जेवत नाहीत. पण एक दिवस संजय दत्त आणि मी हट्टाने त्यांच्या व्हॅनमध्ये गेलो.” (Entertainment News)

पुढे सुनील म्हणाला की, व्हॅनमध्ये गेल्यावर मी आणि संजय दत्तने जे दृश्य पाहिलं त्याने आमच्या मनात अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा आदर दहा पटीने वाढवला. सुनील शेट्टीने सांगितलं की, “आम्ही त्यांच्या व्हॅनमध्ये गेलो तेव्हा तेथे एका डॉक्टरकडून बिग बी फिजिओथेरपी करून घेत होते. त्यांच्या खांद्यामध्ये खूप वेदना होत्या, त्यांची मान आखडली होती. त्यामुळेच दुपारच्या लंच ब्रेकच्या वेळेत, ते कोणाला न सांगता, पुढील काही तास शूटिंग करता यावं यासाठी व्हॅनमध्ये जाऊन उपचार करून घेत होते. त्यांनी आम्हाला कधीही याबद्दल सांगितलं नव्हतं. आम्हाला हे कळाल्यावर मनात त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम खूप वाढला”… (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Suneil Shetty : सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….
================================
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ‘रामायण’, ‘कल्की २’ आणि ‘द इंटर्न’ या चित्रपटात ते दिसणार आहेत… तर, सुनील शेट्टी ‘हेरा फेरी ३’ आणि ‘वेलकम टु द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे… येत्या काळात बॉलिवूडमध्ये खरं तर बिग बजेट चित्रपट मोठ्या संख्येने येणार आहेत आणि यासाठी चाहते फार उत्सुक आहेत…. (Bollywood Movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi