Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

120 Bahadur : फरहान अख्तरकडून खूप अपेक्षा होती पण…

‘संगीत देवबाभळी’ फेम Shubhangi Sadavarte पुन्हा अडकणार लग्नबंधनात; 3 महिन्यांआधीच झाला

घराला लागलेल्या भीषण आगीतून ‘या’ व्यक्तीमुळे वाचला Shiv Thakare चा जीव !

Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम

Natraj Studio : चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा घटक

Madhuri Dixit हिच्या ‘मिसेस देशपांडे’ वेबसीरीजची पहिली झलक आली समोर

स्मृती मंधनाचा होणारा नवरा Palash Muchhal आहे तरी कोण?

Heeramandi 2 ; संजय लीला भन्साळींच्या नव्या सीझनकडून प्रेक्षकांना मोठी

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है….

 Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है….
बात पुरानी बडी सुहानी

Talat Mahmood : है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है….

by धनंजय कुलकर्णी 22/11/2025

संगीतकार शंकर जयकिशन यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तलत महमूद यांनी केवळ १९ गाणी गायली होती. इतर गायकांच्या तुलनेत ही संख्या कमी जरी वाटत असली तरी यातील हरेक गीत आजही रसिकांच्या मनात ताजे आहे. मला वाटतं ही किमया एस जे यांच्या सुरांच्या सोबतच तलत मेहमूद यांच्या स्वराची देखील आहे. तलत च्या हिंदी चित्रपटातील गाण्याची संख्या मुळातच कमी असल्यामुळे सहाजिकच शंकर जयकिशन यांच्याकडे देखील त्यांनी गाणी कमी गायली. आपण ज्यावेळेला तलत आणि शंकर जयकिशन हे कॉम्बिनेशन बघू लागतो त्यावेळेला असं लक्षात येतं की देवआनंद करीता तलत मेहमूद हा प्रकार त्यांनी बऱ्याचदा हाताळलेला दिसतो. देवच्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत ज्या ज्या वेळी दिल त्या त्या वेळी तलतच्या स्वराची त्यांना आठवण झाली. तसेच दिलीपकुमार करीता तलत हे कॉम्बिनेशन वापरले.

आपण ज्या वेळेला एस जे आणि तलत यांच्या कारकीर्दीचा विचार करू लागतो त्या वेळी पहिल्यांदा आपल्या नजरेसमोर येतो  १९५२ साली प्रदर्शित झालेला अमिया चक्रवर्ती यांचा ‘दाग’ हा चित्रपट. दिलीपकुमार या चित्रपटाचा नायक होता.  या चित्रपटांमध्ये तलत यांचा स्वर पहिल्यांदा एस जे यांच्या कडे ऐकायला मिळाला. यातील  ‘ऐ मेरे दिल कही और चल गम की दुनिया से दिल भर गया…’ या अप्रतिम गीताला खरं तर आधी मुकेश गाणार होता पण दिलीपने तलतच्या नावाचा आग्रह केला. यात अकॉर्डियन या वाद्याचा अप्रतिम वापर केला होता. व्ही. बलसारा यांनी ते वाजवले होते. याच चित्रपटात तलत ला आणखी दोन गाणी होती. ‘हम दर्द के मारो का इतना ही जमाना है‘ आणि ‘कोई नही मेरा इस दुनिया में आशिया बरबाद है’ या दोन्ही रचना स्वरबध्द करताना मेंडोलीन, सितार, अकॉर्डियन, वॉयलीन आणि सारंगी या वाद्यांचा अतिशय सुरेख वापर एस जे यांनी केला होता.  

यानंतर आला ‘पतिता’ (१९५३) हा चित्रपट. या चित्रपटाचा नायक देव आनंद असला तरी यातली तलत ने गायलेली दोन गाणी अभिनेता आगा यांच्यावर चित्रित झाली होती. ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते जाये तो जाये कहा…’  त्याच प्रमाणे ‘तुझे अपने पास बुलाती है तेरी दुनिया’ पण मला वाटतं या चित्रपटातील सर्वात सुंदर जे गाणं होतं ते म्हणजे ‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर में गाते है…’ चित्रपटात हे गाणं देव आनंद वर चित्रित झालं होतं.( शैलेन्द्रच्या या गीतावर आंग्ल कवी शेले च्या Our sweetest songs are those that tell of saddest thought. या कवितेची गडद च्या दिसते!) या तलत च्या गीतांनी रसिकांच्या दिलात अजरामर असं स्थान मिळविले आहे. या गाण्यात एस जे यांनी ऑर्केस्ट्रेशन मध्ये अकॉर्डियन आणि मेंडोलीन चा फार सुरेल वापर केला आहे.

यानंतर १९५४  साली  आलेल्या ‘बूट पॉलिश’ या चित्रपटात आशा भोसले यांच्यासोबत तलत यांनी गायलेल्या  ‘चली कौन से देस गुजरिया तू सज धजके’ या गीतात मेंडोलीन चा फार सुंदर वापर केल्याने गीताची गोडी आणखी वाढली. लता मंगेशकर सोबत १९५२ साली आलेल्या ‘परबत’ या चित्रपटातील ‘होटो पे तराने आ गये जी हम तो दिल की तमन्ना पा गये’ हे गीत आज विस्मृतीत गेलं असलं तरी अतिशय मधुर आहे. तलत महमूद  काही एस जे यांचा लाडका गायक नव्हता त्यामुळे त्याला फार कमी संधी यांच्या संगीत नियोजनात मिळाली.

‘शिकस्त’ हा चित्रपट तसा व्यावसायिक दृष्ट्या फारसा सफल झाला नाही पण याचे संगीत अतिशय मेलडीयस होते.तलत ने गायलेल्या ‘सपनों की दुनिया को आंखो में बसाना मुश्कील है’ या गीतात सितार,तबला आणि हार्मोनियम या वाद्यांचा सुरेल समन्वय साधला गेला. दिलीप कुमार आणि नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित या चित्रपटात एक अतिशय मधुर युगल गीत होते तलत आणि लताच्या स्वरात. ‘जब जब फुल खिले तुझे याद किया हमने’ गीतकार शैलेंद्र यांचं अतिशय आवडतं हे गाणं होतं. शैलेंद्र यांच्या एका काव्यसंग्रहाचे शीर्षकच होते ‘जब जब फूल खिले’.

================================

हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

================================

या जोडीचा ‘रुप की रानी चोरों का राजा’ हा चित्रपट १९६२ साली प्रदर्शित झाला . देव-वहिदा हि हिट जोडी आणि अप्रतिम गाणी असून देखील या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. पण या चित्रपटात तलत मेहमूद यांना शंकर जयकिशन यांच्याकडे गायची पुन्हा संधी मिळाली. यातील ‘तुम तो दिल के तार छेड कर हो गये बेखबर चांद की तरह लेंगे हम रात भर’ हे Tandom Song खूप गाजलं होतं. या चित्रपटात ‘तू रूप की रानी चोरों का राजा’ हे लता सोबत तलत चे युगल गीत मस्त जमले होते. या दोन्ही गीतात गिटार चा सुंदर वापर केला होता. तलत एस जे यांच्या कडे संख्येने कमी जरी गायला असला तरी या गाण्याची लोकप्रियता प्रचंड होती.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Dev Anand Dilip kumar Entertainment Mukesh talat mahmood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.