
बॉलिवूडचा He-Man हरपला; ज्येष्ठ महान अभिनेते Dharmendra यांचं ८९व्या वर्षी निधन
हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र सिंग देओल (Dharmendra) यांचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन झालं… गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होतेच… अखेर २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचे He Man धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे… फिल्म मेकिंगमधील ब्लॅक अॅंड व्हाईट ते अगदी आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा ड्रास्टिक चॅंड पाहणाऱ्या धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांना आपल्या जाळ्यात ओढून घेतलं होतं ते कायमचच…

८९व्या वर्षी देखील अगदी तरुण कलाकारांना लाजवेल असे हॅंडसम धर्मेंद्र तितकाच उत्साह आणि ऊर्जा भूमिका साकारताना दाखवत होते… २०२४ मध्ये तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटात त्यांनी शेवटचा अभिनय केला… म्हणतात ना की कलाकार शेवटच्या श्वासापर्यंत केवळ अभिनय करण्यासाठीच धडपडत असतो… ही फ्रेज धर्मेंद्र खऱ्या अर्थाने जगले यात शंकाच नाही… १९६० ते २०२४ असा ६५ वर्षांचा इंडस्ट्रीतला धर्मेंद्र यांचा प्रवास उल्लेखनीय होता… एकेकाळी सर्वात महागडा सुपरस्टार असणाऱ्या धर्मेंद्र यांच्या फिल्मी प्रवासावर एक नजर टाकूयात… (Entertainment News)
८ डिसेंबर १९३५ मध्ये पंजाबमधील शिक्षकी कुटुंबात धरम पाजींचा जन्म झाला… किशन सिंग देओल आणि पत्नी सतवंत कौर यांना झालेल्या या पुत्राने अभिनयातच करिअर करण्याचं पक्क केलं होतं… वडिल शिक्षक असले तरी अभ्यासाची गोडी धर्मेंद्रंना कधीच नव्हती… लहानपणापासून अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या धर्मेंद्र यांना आपलं ते स्वप्न आईमुळे पुर्ण करता आलं… आईच्या पाठिंब्यामुळे पंजाब ते मुंबई असा प्रवास धर्मेंद्र यांनी केला.. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत एकदा सांगितलं होतं की, “चित्रपटात करिअर करण्यापू्र्वी मी गॅरेजमध्ये राहायचो… माझ्याकडे मुंबईत राहण्यासाी तेव्हा घर नव्हतं… तेव्हा एका ड्रिंलिंग फर्ममध्ये काम करायचो आणि त्यावेळी महिन्याला २०० रुपये पगार मिळायचा… अजून पैसे मिळवायला ओव्हरटाईम करायचो… पण मन चित्रपटाकडेच होतं…” अखेर त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आणि अखेर १९६०मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मनोरंजन करत त्यांनी प्रेक्षकांचा हात घट्ट पकडून ठेवला… (Dharmendra News)

रोमॅंटिक चित्रपटांसोबतच अॅक्शनही करणाऱ्या धर्मेंद्र यांना १९६६ मध्ये रिलीज झालेल्या ‘फूल और पत्थर’ चित्रपटामुळे अॅक्शन हिरोचा टॅग लागला… मग काय बॉलिवूडच्या या He Man ने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही… ‘बंदिनी’, ‘सूरत और सीरत’, ‘शोले’, ‘आझाद’, ‘माँ’, ‘अंधा कानून’, ‘गुलामी’, ‘हिंमतवार’,’साजिश’, ‘राम बलराम’, ‘दो दिशायें’, ‘खतरों कें खिलाडी’, ‘नफरत की आंधी’, ‘दुश्मन देवता’, ‘अपने’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारत स्वत:चा ऑरा जपला…(Dharmendra Movies)
================================
हे देखील वाचा : Dharmendra :“कधी सुटका मिळणार या गैरसमजांमधून?; धर्मेंद्रंची पोस्ट व्हायरल
================================
धर्मेंद्र यांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांनी कधीच स्त्री प्रधान अर्थात Female Centric चित्रपटांना नकार दिला नाही… कारकिर्दिच्या सुरुवातीला त्यांनी अभिनेत्री नुतन यांच्यासोबत ‘सुरत और सीरत’ हा चित्रपट केला होता, ज्यात मेन हिरोईन नुतन यांच्यावर कथेचा पुर्ण फोकस होता… याशिवाय, ‘बंदिनी’, ‘सीता और गीता’ असे बरेच स्त्री प्रधान चित्रपट त्यांनी केले आणि आपल्या भूमिकेतून कथेला न्याय दिला…. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या परिपक्व अभिनयाने समृद्ध करणाऱ्या He Man धर्मेंद्र यांना कलाकृती मीडियातर्फे भावपूर्ण आदरांजली….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi