
72 सुपरहिट गाणी असलेला एकमेव Indian Cinema! ‘या’ चित्रपटाचा रेकॉर्ड जगभरात आजपर्यंत कोणी मोडू शकलं नाही
काही चित्रपट हे भन्नाट कथानकांमुळे लक्षात राहतात तर काही स्टारकास्टमुळे… पण या सगळ्यापेक्षाही कुठलाही चित्रपट कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी संगीत फार महत्वाचं असतं… चित्रपटाची कथा काय होती? किंवा त्यात लीड हिरो-हिरोईन कोण होते ही आठवण जरी पुसट झाली तरी गाणी मात्र चिरतरुण राहतात याच शंकाच नाही… आणि म्हणूनच बरेचहे बॉलिवूडपट गाण्यांमुळे हिट झाले… असाच एक हिंदीत चित्रपट येऊन गेला ज्यात ३-४ नाही तर तब्बल ७२ गाणी होती… जगभरात आजवर कुठलाच चित्रपट याचा रेकॉर्ड मोडू शकला नाही… गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारा हा भारतीय चित्रपट आहे तरी कोणता? चला जाणून घेऊयात… (Bollywood Movie)

तर, आधी म्हटल्याप्रमाणे हिंदीत असे बरेच चित्रपट येऊन गेले ज्यांची गाणी आजही युट्यूब किंवा इकर कुठल्याही म्युझिक App वर आपण आवर्जून ऐकतो… शिवाय, ३-४ पेक्षा अधिक गाणी असणारे काही चित्रपटही येऊन गेले… नावं घ्यायचीच झाली तर ‘हम साथ साथ है’, ‘हम आपके है कौन’, देवदास’ आणि असे बरेच चित्रपट… पण ९३ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या एका हिंदी चित्रपट ७२ सुपरहिट गाणी होती… आणि तो चित्रपट म्हणजे ‘इंद्र सभा’ (Indra Sabha Movie 1932)… १९३२ मध्ये रिलीज ३ तास ३१ मिनिटांचा हा चित्रपट अशा काळात बनवण्यात आला होता जेव्हा ध्वनी चित्रपटांचा युग अगदी नुकताच सुरू झाला होता… दरम्यान, इंद्र सभा नावाचे दोन चित्रपट खरं तर बनवण्यात आले होते… त्यातला पहिला चित्रपट मणिलाल जोशी यांनी दिग्दर्शित केला होता जो मुकपट होता… आणि त्यानंतर ध्वनी युग सुरु झाल्यानंतर ‘इंद्र सभा’ हा दुसरा चित्रपट आला ज्यात १५सामान्य गाणी, ९ ठुमरी, ४ होळी गाणी, ३१ गझल, २ चौबोले, ५ छंद आणि आणखी ५ अशी एकूण ७२ गाणी होती… (Entertainment News)

‘इंद्र सभा’ या चित्रपटाची कथा एका राजाची होती… एक दयाळू आणि न्यायी राजा ज्याडं आपल्या प्रजेवर नितांत प्रेम होतं आणि तो कायम गरजूंना मदत करणारा होता… एकदा होतं असं की, त्याच्या करुणा आणि उदारतेची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचते आणि इंद्राच्या दरबारातील एक सुंदर अप्सरा राजाची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर येते आणि त्याची परीक्षा घेताना, ती त्याच्या गुणांनी इतकी प्रभावित होते की त्याच्यावर मोहित होते असं एकूण चित्रपटाचं कथानक होतं… (Indra Sabha Movie)
================================
हे देखील वाचा : Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….
================================
‘इंद्र सभा’ या चित्रपटात जहांआरा कज्जन आणि मास्टर निसार यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या… जहांआरा कज्जन या केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हे तर एक अद्भुत गायिका देखील होत्या… त्यांना गंबालची कोकिळा असं म्हटलं जात होतं… वयाच्या ३०व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं होतं… अतिशय कमी वयात उत्कृष्ट कलाकृतींचा भाग झालेल्या जहांआरा यांचा ७२ गाण्यांचा रेकॉर्ड असणारा इंद्रसभा चित्रपट अधिक लोकप्रिय ठरला आणि त्या चित्रपटाचा हा विक्रम आजही अबाधित आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi