
“बॉलिवूड कलाकारांना साऊथवाले फक्त…”; Suneil Shetty ने साऊथमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण
इंडस्ट्रीत गॉडफादर नसूनही आपलं स्थान फिल्मी दुनियेत भरभक्कमपणे तयार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सुनील शेट्टी (Suneil Shetty) याचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे… १९९२ ला ‘बलवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुनील शेट्टीने एन्ट्री घेतली… अॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अण्णाने ‘दिलवाले’, ‘अंत’, ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘कृष्णा रक्षक’, ‘बॉर्डर’,’ भाई’,’ हेराफेरी’, ‘धडकन’ असे यशस्वी चित्रपट नावावर केले… एकीकडे संजय दत्त, आमिर खान अशा बऱ्याच या कलाकारांनी साऊथमध्ये काम केलं असताना दुसरीकडे सुनीलने मात्र फारसं साऊथ चित्रपटात काम केलं नाही… याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत सुनीलने खुलासा केला आहे… (Entertainment News)
‘द लल्लनटॉपला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने दाक्षिणात्य चित्रपटांत काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, “मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील भूमिकांसाठी अनेकदा विचारणा झाली आहे. पण, दुर्दैवाने फक्त नकारात्मक भूमिकासांठी विचारलं जातं… ते हिंदी चित्रपटातील नायकांना पडद्यावर नकारात्मक भूमिकेत दाखवतात, हे मला आवडत नाही”… (Suneil Sheety and South Films)

सुनीलने साऊथमध्ये काम केलं नाहीच असं नाही… २०२० मध्ये रजनीकांत यांच्या अॅक्शन थ्रिलर दरबार चित्रपटात सुनीलने नकारात्मक भूमिका साकारली होती.. पण त्यानंतर तो पुन्हा साऊथमध्ये दिसला नाही… ‘दरबार’ चित्रपटाबद्दल बोलताना सुनील म्हणाला की, “मी रजनीकांत (Rajinikanth) यांच्याबरोबर एक चित्रपट केला, कारण मला त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. मोठ्या पडद्यावर मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं.” (Bollywood)
================================
हे देखील वाचा : Sanjay Dutt याने वडिलांच्याच विरोधात सुनील शेट्टीला प्रचार करायला सांगितले आणि…
================================
मातृभाषा तुलू असूनही त्याने साऊथमध्ये फार काम केलं नाही हे जरा नलवच… मात्र, अखेर याच मुलाखतीत सुनील शेट्टीने एका तुलू चित्रपटात काम केल्याचं सांगितलं… तेथील स्थानिक भाषेतील चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचंही त्याने स्पष्ट केलं… सुनील शेट्टीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी अलिकडेच तो ‘केसरी वीर’ आणि ‘नादानियां’ या चित्रपटांमध्ये दिसला होता… आणि पुन्हा एकदा प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) मध्ये श्याम या भूमिकेत दिसणार असून प्रेक्षकांना परत बाबूभैय्या आणि राजू यांची कॉमेडी अनुभवता येणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi