डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

“उंदरासारखे मोबाईल घेऊन…”; पाराझींबदद्ल Jaya Bachchan स्पष्टच बोलल्या
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं पापाराझींचं सोबतचं वर्तन आपल्याला माहित आहेच… बऱ्याचवेळी पापाराझींवर जया बच्चन भडकून त्यांना खडेबोल सूनावत असतात.. त्यांच्या संमतीशिवाय काढल्या जाणाऱ्या फोटोंमुळे त्या पापाराझींवर ओरडत असतात… आता एका मुलाखतीत जया यांनी त्यांचं आणि पापाराझींचं नातं नेमकं कसं आहे यावर स्पष्टपणे भाष्य कें आहे… इतकंच नाही तर मी मीडियाचं प्रोडक्ट आणि मला खऱ्या पत्रकारांसाठी आपुलकी आणि आदर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे…. एकीकडे पापाराझींना सूनावत दुसरीकडे त्यांनी एअरपोर्टवर काही सेलिब्रिटी पैसे देऊन फोटो काढण्यासाठी पापाराझींना बोलवतात त्यावरुनही त्यांनी राग व्यक्त केला आहे… काय म्हणाल्या आहेत जया बच्चन जाणून घेऊयात… (Entertainment News)
‘वी द वुमन’ या शो मध्ये दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी चक्क पापाराझींना ‘उंदीर’ आणि ‘घाणेरड्या पँट घालणारे’ म्हणत टिका केली आहे… “माझे माध्यमांशी खूप चांगले संबंध आहेत. मी मीडियाचं प्रोडक्ट आहे, पण पापाराझींशी माझा अजिबात संबंध नाही. माझं आणि पापाराझींचं नातं शुन्य आहे.. ही लोकं कोण आहेत? ते या देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रशिक्षित आहेत का? तुम्ही त्यांना मीडिया म्हणता? मी मीडियातूनच आले आहे. माझे वडील पत्रकार होते. आणि मला सच्च्या पत्रकारांबद्दल खूप आदर आहे”… (Papparazi and Jaya Bachchan)

पुढे जया बच्चन असं देखील म्हणाल्या की, “ही लोकं घाणेरड्या ड्रेन पाइप पॅन्ट घालतात आणि मोबाईल फोन धरतात मग त्यांना वाटते की ते तुमचा फोटो काढू शकतात आणि त्यांना जे हवे ते बोलू शकतात? शिवाय ते ज्या कमेंट्स पास करतात? ते कोणत्या प्रकारची लोकं आहेत? ते कुठून येतात? त्यांचे शिक्षण कोणत्या प्रकारचे आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? ते फक्त YouTube वर आहेत किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कवर आहेत म्हणून ते आमचे प्रतिनिधित्व करतील असे आहे का? मी कोणत्याही सोशल नेटवर्कवर्कींग साईटवरे नाही, त्यामुळे मला यातलं काही माहित नाही”, त्यामुळे आता जया यांना पापाराझींबदद्ल नेमकं काय वाटतं आणि त्याचं काय मत आहे हे सपष्ट झालं आहे… (Bollywood)
================================
================================
दरम्यान, जया बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर २०२३ मध्ये आलेल्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटात त्या दिसल्या होत्या… तर, २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ‘सहाबहार’ या चित्रपटातही त्यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती… (Jaya Bachchan Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi