डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

सचिनदा आणि Pancham Da : बाप से बेटा सवाई ?
प्रतिभावान आणि यशस्वी व्यक्तीच्या मुलामुलींचा संघर्ष हा अतिशय वेगळ्या प्रकारचा असतो कारण इथे त्यांना स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करण्यासाठी जास्त झगडावे लागते. त्यामुळेच समाजात बऱ्याचदा प्रतिभावंतांच्या पुढच्या पिढीला गुणवत्ता असून देखील अपयशाचा सामना करावा लागतो. क्रिकेटमध्ये सुनील गावस्करचा मुलगा रोहन गावस्कर असेल ,अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन असेल, राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरव असेल किंवा मनोजकुमारचा मुलगा कुणाल गोस्वामी असेल. रफी,किशोर,मुकेश,आशा, तलत या गायक मंडळीच्या पुढच्या पिढीला मोठे करीअर करता आले नाही हि वस्तुस्थिती आहे. या सर्वांकडे टॅलेंट नव्हतं कां ? तर भरपूर होतं पण कायम तुलना आपल्या पालकांशी झाल्यामुळे त्यांच्या तुलनेने यश कमी मिळत गेलं. त्यांच्या यशाची मोजपट्टी त्यांच्या आई वडलांच्या यशाशी जुळवण्याचा प्रयत्न झाल्याने लोचा होत गेला.
संगीतकार सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन जेव्हा हिंदी चित्रपट संगीत देण्यासाठी मैदानात आला तेव्हा पिताश्री एस डी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. आर डी ला देखील आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी भरपूर झगडावे लागते. १९६१ सालच्या ‘छोटे नवाब’ या चित्रपटापासून आर डी बर्मन यांची संगीतमय कारकीर्द सुरू झाली, वडिलांचा प्रचंड मोठ्या यशाचा डोलारा आर डी बर्मन यांच्यासाठी समृद्ध वारसा तर होताच पण एक अडसर देखील होता. या वलयातून त्यांना बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्या साठीचा त्यांचा तो संघर्ष होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यानी अभिजात भारतीय संगीता सोबत वेस्टर्न म्युझिकचा आपल्या संगीतात अंतर्भाव करायला सुरुवात केली.

‘भूतबंगला’ (१९६५) या सिनेमात त्यांनी याची झलक दाखवली. त्या काळात सचिन देव बर्मन आपल्या पुत्राच्या या प्रयत्नाबाबत थोडे साशंक होते. ते एकदा हसरत जयपुरी यांना म्हणाले होते की,” पंचमला सांगा. भारतीय चित्रपटाचे संगीत नेमकं कसं असतं.लोकांना काय आवडतं” हसरत जयपुरी यांनी हा निरोप पंचमला दिला तेव्हा पंचम ने सांगितले की,” माझ्या करिअर बाबत त्यांना वाटणारी काळजी साहजिक आहे. पण मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मी जर त्यांच्यासारखंच संगीत देऊ लागलो तर मला सगळेजण म्हणतात हा वडिलांची कॉपी करतो. मला त्यांच्या संगीताचा अभिमान आहे. माझ्यासाठी तो एक समृद्ध वारसा नक्कीच आहे. पण त्या बरोबरच मला माझी स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची आहे. आणि त्यात दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे!”

१९६६ साली गोल्डी दिग्दर्शित ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील संगीताने आर डी बर्मन यांनी स्वतःच्या संगीताची वेगळी आयडेंटिटी निर्माण केली. त्यांची एक वेगळी ओळख या निमित्ताने निर्माण झाली. संगीतकार सचिन देव बर्मन यांना देखील या चित्रपटाचं संगीत आवडलं होतं. ते त्यांच्या मुलाला म्हणजे आर डी बर्मन यांना म्हणाले,” एक गोष्ट नक्की आहे. तुझं संगीत इतरां पेक्षा नक्कीच वेगळं आहे. आणि मला तुझी हीच गोष्ट जास्त अपील झाली आहे. !” आर डी बर्मन यांच्यासाठी हे फार मोठे प्रशस्तीपत्र होतं. सचिन देव बर्मन यांना आनद होता की आर डी यांच्या संगीतात पारंपारिक भारतीय संगीतासोबतच अभिजात जाझ आणि रॉक सारख्या आधुनिक जागतिक शैलींचे मिश्रण होते.
================================
================================
‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील भारतीय चित्रपट संगीतात वेगळा ठसा उमटवला. वेस्टर्न म्युझिकचा नवा ट्रेंड आर डी बर्मन यांनी यात सुरू केला. आर डी बर्मन यांनी वेस्टर्न सोबतच अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर देखील आपल्या चित्रपटात मुबलक केला पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुंदर मिलाफ पंचमच्या संगीतात दिसत होता!एकीकडे ‘चिंगारी कोई भडके’ सारखं अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर रचलेलं भैरवी रागातील गीत असो असो आणि सोबतच ‘दम मारो दम’ सारखं पाश्चात्य शैलीतील गीत असो आर डी कुठेच कमी पडायचा नाही! आज इतक्या वर्षानंतर देखील ‘आंधी’, ‘परिचय’, ‘घर’, ‘इजाजत’, ‘खुशबू’, ‘किनारा’, ‘अमर प्रेम’, ‘कुदरत’ या सिनेमातील आर डी ची गाणी समाज माध्यमावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आर डी आणि एस डी यांची समांतर संगीत कारकीर्द तब्बल १५ वर्षे सोबत चालू होती!