Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“कर लो ना थोडी मेहनत”; ८ तासांच्या शिफ्टसाठी दीपिकाचा हटट् पण Ranveer Singh चं ‘ते’ विधान व्हायरल

 “कर लो ना थोडी मेहनत”; ८ तासांच्या शिफ्टसाठी दीपिकाचा हटट् पण Ranveer Singh चं ‘ते’ विधान व्हायरल
मिक्स मसाला

“कर लो ना थोडी मेहनत”; ८ तासांच्या शिफ्टसाठी दीपिकाचा हटट् पण Ranveer Singh चं ‘ते’ विधान व्हायरल

by रसिका शिंदे-पॉल 15/12/2025

अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिने ८ तासांची शिफ्ट चित्रपटांच्या शुटींग सेटवर असावी अशी मागणी धरुमन ठेवली आहे… तिच्या या मागणीमुळे तिला ‘स्पिरीट’, ‘कल्की २८९८ एडी- २’ या चित्रपटांमधून हात धुवावे लागले… शिवाय बॉलिवूड आणि साऊथच्या काही कलाकारांनी तिच्या मागणीचं स्वागत केलं तर काहींनी विरोधही केला.. पण आता तिचा नवरा रणवीर सिंग (Ranveer Singh) यानेच ८ तासांच्या शिफ्टवर एक महत्वाचं विधान केल्याचा जुना व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.. (Bollywood News)

रणवीर सिंगने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जास्त काम करण्याच्या तासांवर आपले मत व्यक्त केलं होतं… यात तो म्हणाला होता की, “अनेकदा लोकं मला म्हणतात की, मी सगळ्यांना बिघडवत आहे. सगळे म्हणतात, ८ तासांच्या शिफ्टमध्ये मी कधी कधी १०-१२ तास शूटिंग करतो. माझ्यामुळे इतर कलाकारांनाही तसंच करावं लागतं. पण, आता ८ तासांमध्ये हवी असलेली गोष्ट तयार होत नसेल, तर ठीक आहे ना. थोडी जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे.” त्यामुळे आता जुन्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे रणवीर ८ तासांच्या शिफ्टवर व्यक्त केलेल्या विधानावर आजही कायम आहे का? याबद्दल जाणून घेण्याची लोकांची उस्तुकता अधिक वाढली आहे… दरम्यान, हा व्हायरल झालेला व्हिडिओ २०२२चा आहे… (Entertainment News)

सध्या रणवीर सिंग आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे… रणवीरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६४ कोटी देशात आणि ५५२.७० कोटी जगभरात कमावले आहेत… शिवाय, ‘धुरंधर’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी आदित्य धर यांनी संपूर्ण टीमने मेहनत करत गेले दीड वर्ष काहीवेळा १६ ते १८ तास शूटिंग करत चित्रपट पर्ण केल्याचं म्हटलं होतं… तसेच, ‘धुरंधर पार्ट २’ १९ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही अधिकृतपणे जाहिर करण्यात आलं आहे…

दरम्यान, लोकांनी आणि इंडस्ट्रीतीलच काही कलाकारांनी दीपिका पादूकोणच्या या मागणीवर तिला ट्रोल केल्यानंतर सीएनबीसी टीव्ही १८ला दिलेल्या मुलाखतीत तिने ८ तास काम करण्याच्या मागणीवर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं… ती म्हणाली होती की,”एक महिला कलाकार म्हणून जर या गोष्टी तुम्हाला दबावासारख्या वाटत असतील, तर तसंच तुम्ही समजू शकता… गेली अनेक वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रामुख्याने पुरुष सुपरस्टार ८ तासांची शिफ्ट करताना दिसत आहेत, पण या गोष्टी कधीच चर्चेत आल्या नाहीत.” (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : ८ तासांच्या शिफ्ट ट्रोलिंगवर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली, “बरीच वर्ष मेल सुपरस्टार्सही….”

================================

रणवीर सिंग लवकरच ‘धुरंधर पार्ट २’, ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटात झळकणार आहे… तर, दीपिका पादकोण ‘किंग’ आणि Atlee सोबत एक नवा चित्रपट करणार आहे ज्यात ती अल्लू अर्जूनसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचं सांगितलं जात आहे… तर, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलीयो की रासलीला-रामलीला’, ‘पद्मावत’, ‘८३’, ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांमध्ये एकत्र झळकलेले रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण लवकरच एकत्र पुन्हा दिसावे याची चाहते वाट पाहात आहेत… (Ranveer Singh and Deepika Padukone movies together)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar bollywood update Deepika Padukone deepika padukone. dhurandhar Entertainment Entertainment News Ranveer Singh ranveer singh movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.