
पुन्हा सलमान खानवर विनोद करणार का? Pranit More ने ‘हात जोडून’ दिलं ‘असं’ उत्तर
‘Bigg Boss Hindi 19’ हा सिझन प्रेक्षकांसाठी अनेक कारणांनी लक्षवेधी ठरला. विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) असला, तरी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेला मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) ही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. फरहाना भट्टने दुसरा क्रमांक पटकावला, तर प्रणितने टॉप 3 मध्ये स्थान मिळवत अनेकांच्या वर्तवलेला अंदाज चुकीचा ठरवला. प्रणित मोरे बिग बॉसमध्ये येण्याआधीच सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याच्या बेधडक विनोदांमुळे अनेक बॉलिवूड कलाकार त्याच्या शो मध्ये मध्ये टार्गेट झाले होते. यात सुपरस्टार सलमान खानचं नावही होतं. त्यामुळेच बिग बॉसच्या घरात पाऊल टाकताच त्याचे जुने व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाले आणि थेट सलमानच्या नजरेत आले. (Pranit More)

शोच्या सुरुवातीच्या टप्प्यात सलमान खानने प्रणितला याबाबत स्पष्ट शब्दांत सुनावलं. मात्र नंतर सलमानने मोठ्या मनाने प्रतिक्रिया देत, “माझ्यामुळे कुणाचं घर चालत असेल तर मला काही हरकत नाही,” असं म्हणत त्याला माफ केलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली होती. सलमानशी पंगा घेतल्यामुळे प्रणित फार काळ टिकणार नाही, अशी भाकितं ही केली जात होती.पण प्रत्यक्षात घडलं अगदी उलट. प्रणितने आपला खेळ, संयम आणि विनोदी स्वभाव जपत थेट अंतिम तीनमध्ये मजल मारली. त्यामुळे शो संपल्यानंतर एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. आता प्रणित पुन्हा सलमान खानवर विनोद करणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

बिग बॉस 19 च्या यशानिमित्त आयोजित पार्टीत सर्व स्पर्धक एकत्र जमले होते. याच वेळी पापाराझींनी प्रणितला हा थेट सवाल विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी प्रणितने फक्त हसत हात जोडले. एक शब्दही न बोलता त्याने आपली भूमिका स्पष्ट केली. याच क्षणी अभिषेकने मिश्कील टिप्पणी करत, “ते कधीच माफ करत नाहीत,” असं म्हटलं. त्यावर प्रणितने शांतपणे, पण मनापासून प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला मला आनंदी पाहायचं नाही का? आपले सलमान भाऊ खरंच खूप चांगले आहेत.”अस तो म्हणाला. (Pranit More)
=================================
=================================
प्रणितच्या या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, बिग बॉसनंतर तो अधिक परिपक्व झाला आहे का? की आता त्याच्या विनोदांची दिशा बदलणार आहे? हे येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी प्रणितने हसत-मुखाने या विषयावर पडदा टाकल्याचं स्पष्ट दिसतं.