
“बिचारा संतोष! तो स्वतःचीच ‘लाल’ करतोय असं वाटत असेल, पण…”, Kranti Redkarने सावरली मित्राची बाजू
२०२५ हे वर्ष मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये गाजवलं… आणि यातलं महत्वाचं नाव म्हणजे संतोष जुवेकर (Santosh Juvekar)… लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava Movie 2025) चित्रपटात संतोषने आपल्या अभिनयाचा डंका वाजवला होता… आणि या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी विकी कौशलला (Vicky Kaushal) माझ्याशिवाय सेटवर करमत नाही असं विधान त्याने केलं होतं… संतोषला त्याच्या या वक्तव्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता… आता या ट्रोलिंगवर त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने संताप व्यक्त करत संतोषची बाजू सावरली आहे… काय म्हणाली आहे क्रांती जाणून घेऊयात… (Kranti Redkar)

तर, ‘छावा’ प्रमोशन्सवेळी संतोषने दिलेल्या काही मुलाखतींमध्ये विक्की कौशलसोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य केले होते. “विक्कीला माझ्याशिवाय चैन पडायची नाही,” या त्याच्या विधानाची नेटकऱ्यांनी प्रचंड खिल्ली उडवली होती. यामुळे ट्रोल झालेल्या संतोषला स्वतः व्हिडीओ करुन आपली बाजू मांडावी लागली होती… आता यावर क्रांतीने लोकशाहीला दिलेल्साय मुलाखतीत तिचं मत मांडलं आहे… क्रांती म्हणाली की, “बिचारा संतोष! पण तो स्वभावानंच तसा मजेशीर आणि गोड आहे. तो स्वतःचीच ‘लाल’ करतोय असं लोकांना वाटत असेल, पण खरं सांगायचं तर तो अतिशय ‘ग्राऊंडेड’ आणि ‘डाऊन टू अर्थ’ माणूस आहे.” (Bollywood News)

क्रांती पुढे म्हणाली की, “मी संतोषला वैयक्तिकरीत्या ओळखते, त्यामुळे त्याने जेव्हा सांगितलं की विकीला त्याच्याशिवाय चैन पडायची नाही, तेव्हा माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्यांना तो माहिती नाही, त्यांना हे विचित्र वाटू शकतं. पण विकी कौशलने देखील त्यावर सकारात्मक कमेंट केली होती, हे विसरून चालणार नाही.” (Entertainment News) तसेच, टीका करणाऱ्या ट्रोलर्सना खडेबोल सुनावताना क्रांती पुढे असं देखील म्हणाली की, “लोकं वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत, हे माहिती नसताना त्यांच्यावर कमेंट करू नका. कलाकार जर काही सांगत असेल, तर त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असते.”
================================
हे देखील वाचा : संतोष जुवेकरच्या ‘त्या’ विधानावर Vicky Kaushal याची प्रतिक्रिया!
================================
दरम्यान, क्रांती रेडकर बद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या क्रांतीने हळूहळू दिग्दर्शनाकडे आपली वाटचाल सुरु केली… २००० मध्ये ‘सुन असावी अशी’ या चित्रपटातून डेब्यु करणारी क्रांती पुढे ‘जत्रा’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘सख्खा सावत्र’, ‘ड्युटी २४तास’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘नो एन्ट्री – पुढे धोका आहे’, ‘मर्डर मेस्त्री’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसली… तसेच, २०१५ मध्ये आलेल्या ‘कांकण’ चित्रपटातून तिने आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली होती… या चित्रपटात जितेंद्र जोशी आणि उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या… (Kranti Redkar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi