मुलासाठी Vishakha Subhedar ढसाढसा रडली; सरकारपर्यंत व्हिडिओ पोहचताच अभिनेत्रीला आला

‘या’ चित्रपटासाठी प्रमोशनला पाकिस्तानत गेला पण लोकांचा रिसपॉन्स पाहून Ajay Devgan का भंडावला?
आपले फेव्हरेट कलाकार या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतातच… कधी त्यांच्या येणाऱ्या आगामी चित्रपटामुळे तरी कधी चित्रपटांच्या सेटवरील किस्स्यांमुळे… असाच काहीसा एक किस्सा घडला होता अभिनेता अजय देवगण सोबत… अजय देवगणला एका चित्रपटानिमित्त पाकिस्तानात जावं लागलं होतं आणि तिथे तो अडचणीत सापडला होता… नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात हा इंटरेस्टिंग किस्सा…
२००६ मध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी ओथेलो या नाटकावर आधारित ‘ओमकारा’ हा चित्रपट तयार केला होता… अजय देवगण, सैफ अली खान, विवेक ऑबरॉय, करिना कपूर, कोंकना सेन शर्मा अशी भली मोठी स्टारकास्ट या चित्रपटात होती… २५ कोटी बजेट असलेला हा चित्रपट त्यावर्षी भारतात फ्लॉप ठरला होता पण आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये ओमकारा सुपरहिट ठरला होता… या चित्रपटातील लंडगा त्यागी या पात्राची विशेष क्रेझ पाकिस्तानात निर्माण झाली होती… आणि याच चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अजय थेट पाकिस्तानात एका चॅट शोमध्ये पोहोचला होता…
लेट नाईट विथ बेगम नवाजिश अली या वादग्रस्त आणि तितक्याच लोकप्रिय शोमध्ये अजय देवगणने हजेरी लावली होती… यावेळी मुलाखतकार बेगम अलीने अजयला पत्नी काजोलबद्दल प्रशन विचारुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता… पाकिस्तानच्या या दौऱ्याबद्दल बोलताना एका मुलाखतीत अजय म्हणाला होता की, “मला वाटलं नव्हतं की ‘ओमकारा’ला पाकिस्तानात इतकं प्रेम मिळेल. मी पहिल्यांदाच इथे आलो आहे आणि इथले लोक माझ्या कल्पनेपेक्षा जास्त प्रेमळ आहेत. हा प्रतिसाद पाहून मी थक्क झालोय, माझ्याकडे शब्द नाहीत”, असं तो म्हणाला होता…
======
हे देखील वाचा : Priyanka Chopra : ‘बर्फी’तील झिलमिल ५ दिवसांत कशी घडली?
======
दरम्यान, २०२५ या वर्षात ‘रेड २’, ‘मैदान’, ‘दे दे प्यार दे २’, ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटांमध्ये अजय झळकला होता… आणि आता २०२६ मध्ये अजयचा ‘दृश्यम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला २ ऑक्टोबर २०२६ रोजी भेटीला येणार आहे… तसेच, शैतान २ देखील प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi