
गिरीजा ओकला पाहून Emraan Hashmi देखील झालेला फिदा!; एकत्र विमान प्रवासातला ‘तो’ किस्सा चर्चेत
२०२५ या वर्षात मराठीसह हिंदी फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच घटना घडल्या… बरेच नवे कलाकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून आपल्या भेटीला आले तर काही सेलिब्रिटींचं आयुष्य रातोरात बदललं… त्यापैकी एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak)… निळ्या साडी नेसून लोकांना वेड लावणारी गिरीजा या वर्षातील नॅशनल क्रश झाली… बऱ्याच वर्षांपासून मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये ती कामं कत होतीच; परंतु, एखा मुलाखतीमुळे तिला नॅशनल क्रश ही ओळख मिळाली… पण तुम्हाला माहित आहे का आपल्या या मराठमोळ्य़ा गिरीजाला पाहून चक्क इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) दंग झालेला… नेमका काय होता तो किस्सा जाणून घेऊयात… अभिनेत्री-दिग्दर्शिका कांचन अधिकारी (Kanchan Adhikari) यांनी ‘तरुण भारत’ला दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजा ओक (National Crush Girija Oak) आणि इम्रान हाश्मीचा एक खास किस्सा सांगितला…

२००४ मध्ये गिरीजा आणि स्वप्नील जोशीचा ‘मानिनी’ हा चित्रपट आला होता. त्या चित्रपटाच्या शूटनंतर गिरीजा दुबईवरुन भारतात येत असताना विमानात चक्क इम्रान हाश्मी तिच्याकडे एकटक पाहत होता. हा किस्सा सांगताना कांचन म्हणाल्या की, “२००४ साली मी ‘मानिनी’ हा माझा पहिला चित्रपट केला. आम्ही तीन निर्माते होतो. तिघांनी मिळून पैसे जमवले आणि मानिनी केला. तो पहिलाच मराठी सिनेमा आहे ज्याचं परदेशात शूट झालं. आम्ही दुबईला १२ दिवसांचं शूट केलं होतं. गिरीजा ओक जी आता तुमची नॅशनल क्रश आहे ती तेव्हा त्या चित्रपटात होती. आम्ही दुबईवरुन येत होतो तेव्हा विमानात इम्रान हाश्मी होता. तो ‘मर्डर’ (Murder Movie) चित्रपटाचं शूटिंग करुन येत होता. गिरीजा तर तेव्हा कॉलेजमध्ये होती. तेव्हा तिचे लांबसडक सरळ केस होते. तजेलदार त्वचा आणि दिसायला अतिशय सुंदर होती. आजही आहेच. नॅशनल क्रश ती होणारच होती कारण तेव्हा इम्रान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता. त्यामुळे इम्रान हाश्मीची क्रश ती नॅशनल क्रश होणारच ना! माझ्या असिस्टंटने येऊन मला सांगितलं की,’मॅडम, बघा तो तिच्याकडे पाहतोय’.” (Entertainment News)

पुढे कांचन म्हणाल्या, “पण आज मला गिरीजा नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेली पाहिल्यावर तिच्या काही व्हिडिओवरील कमेंट्स वाचून वाईट वाटलं. मराठी माणूस आधी पाय खेचण्यातच उस्ताद असतो. अरे तुम्ही तिने आधी काय काय काम केलंय, स्ट्रगल केलाय ते बघा. तिचं ‘गौहर जान’ काय सुंदर नाटक आहे. तिने कधीच चुकीचं काही केलं नाही. अंगप्रदर्शन करुन तिने कधीच प्रसिद्धी मिळवली नाही. तुम्ही तिचं कौतुक केलं पाहिजे. आपली मराठी मुलगी त्या स्टेजवर पोहोचलीये त्याची स्तुती करा’”, असं म्हणत ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर दिलं आहे… (Bollywood News)
कांचन अधिकारी यांनी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून कामं करत प्रसिद्धी मिळवली… इतकंच नाही तर काही वर्ष त्यांनी बॅंक ऑफ इंडियात नोकरी देखील केली… रंगभूमीवर काम करता करता दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर भक्ती बर्वे यांच्या प्रोत्साहनाने निवेदिका म्हणून त्यांची निवड झाली. १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या काळात त्यांनी दूरदर्शन वाहिनीवर निवेदिका व वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं…‘बबन प्रभू’ लिखित ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून कांचन अधिकारी यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. (Kanchan Adhikari)
================================
================================
तर,‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या प्रकाश भेंडे यांच्या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. अशोक सराफ यांच्यासोबत नायिका म्हणून या चित्रपटात काम केले. पुढ कांचन यांनी बाबा सावंत यांच्या ‘हिचं काय चुकलं?’ या चित्रपटात रंजना, विक्रम गोखले यांच्यासह भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. किरण शांताराम यांची निर्मिती असलेल्या, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ या चित्रपटातही भूमिका साकारली. तसेच, १९९५ मध्ये ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेचं त्यांनी दिग्दर्शन करत अनेक पुरस्कारही मिळवले… याव्यतिरिक्त आगे की सोच’, ‘ये जो है जिंदगी’, ‘बनते बिगडते’, ‘और भी है राहें’, ‘तितलियॉं’ यासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलाच, शिवाय ‘अभी तो मै जवान हूं’, ‘संबंध’, ‘डोली लेके आयी है दुल्हनियॉं’, ‘हॅंसी वो फसी’ या हिंदी मालिकांचे दिग्दर्शनही केलं आहे. (Girija Oak National Crush)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi