Bai Tujha Ashirwad: स्टार प्रवाहवर नव्या मालिकेचा AI टीजर रिलीज;

“करिअरच्या ६२व्या वर्षी मी महत्वाचा वाटत असेन तर…”; Sachin Pilgoankar यांनी ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
मराठीसह हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता… त्यांनी शेअर केलेल्या त्यांच्या अनुभवांवरुन किंवा चित्रपटाच्य किस्स्यांवरन ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला होता… सचिन यांना केलेल्या ट्रोलिंगवर त्यांची लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgoankar), अभिनेत्री क्रांती रेडकर आणि अशा बऱ्याच कलाकारांनी बाजू घेत ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं… आणि आता अखेर स्वत: महागुरु सचिन पिळगांवकरांनीच सोशल मिडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.. काय म्हणाले आहेत पिळगांवकर जाणून घेऊयात…
तर, ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या चौथ्या पर्वानिमित्त सतिन पिळगांवकर यांनी मुंटाशी संवाद साधला… आणि य़ावेळी त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य करत म्हटलं की, मुळात ट्रोलिंग करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहित नसेल, तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. आणि माझ्या करिअरच्या ६२व्या वर्षी जर का मी त्यांना इतका महत्वाचा वाटत असेन, लोकप्रिय असेन, तर आजवर मी जे काही कमावलं त्याची ही पोचपावती आहे आणि परमेश्वराचीच कृपा आहे”… (Sachin Pilgoanakar reply to trollers)

पुढे सचिन असं देखील म्हणाले की, कदाचित ट्रोलर्सना मी त्यांच्याच वयाचा वाटतो म्हणून ते मला ट्रोल करतात… माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची मला जाणीव आहे… आणि त्यांच्यासाठी मी काम करत राहणार… तुमचं भलं व्हावं असा ट्रोलर्सना मी आशीर्वाद देईन… असं म्हणत सचिन यांनी अगदी स्पोर्टींगली ट्रोलिंगवर भाष्य केलं.. आता सचिन पिळगांवकर यांनी स्वत:चं त्यांच्यावर होणाऱ्य़ा ट्रोलिंगवर स्पष्टपणे आपलं मत मांडल्यानंतर आता तरी त्यांना ट्रोल करणं थांबेल अशी अपेक्षा आहे…(Marathi Entertainment News)
================================
================================
दरम्यान, याआधी वडिलांवर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल श्रियाने आपलं मत मांडलं होतं… ती म्हणाली होती की, “ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सना काहीच काम नसतं, म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावरचं जग असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं, हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे”. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi