
Bigg Boss Marathi 6 च्या घरात गौतमी पाटील ची एंट्री? नव्या प्रोमोने चर्चांना उधाण!
Bigg Boss Marathi च्या नव्या पर्वाची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहोचत आहे. ११ जानेवारीला होणाऱ्या ग्रँड प्रीमियरआधीच एका रहस्यमय स्पर्धकाने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेला एक प्रोमो सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. या प्रोमोमध्ये एक नृत्यांगना साडी सावरत, पायातील घुंगरांच्या ठेक्यावर भारदस्त फेर धरताना दिसते. तिचं नृत्य, अदा आणि आत्मविश्वास पाहून ही काही सर्वसामान्य कलाकार नाही, हे लगेच लक्षात येतं. मात्र, मेकर्सनी अत्यंत हुशारीने तिचा चेहरा लपवून ठेवल्याने सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे.(Bigg Boss Marathi 6)

“कातिलों की कातिल येतेय…” अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये अंदाजांची चढाओढ सुरू झाली आहे. आधीच रितेश भाऊंच्या दमदार एन्ट्रीने वातावरण तापलेलं असताना, या मिस्ट्री डान्सरमुळे चर्चेला नवा मसाला मिळाला आहे. ‘कातिल’ हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात पहिलं नाव चमकलं ते म्हणजे राज्यभर लोकप्रिय असलेली नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच. कमेंट सेक्शनमध्ये “ही गौतमीच आहे” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौतमीने आपण बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे हा अंदाज फोल ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसरं एक नाव सध्या जोरदार चर्चेत आहे राधा मुंबईकर ( Radha Mumbaikar) . संभाव्य स्पर्धकांच्या यादीत तिचं नाव आधीपासूनच आघाडीवर होतं. सोशल मीडियावर व्हायरल होणारे तिचे लावणी आणि डान्स व्हिडिओ पाहता, ती जर बिग बॉसच्या घरात दाखल झाली तर नक्कीच मनोरंजनाचा तडका उडणार, यात शंका नाही.(Bigg Boss Marathi 6)
================================
================================
आता ही ‘कातिल’ अदाकारी नेमकी कोण आहे, याचा उलगडा ग्रँड प्रीमियरलाच होणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता आणि चर्चां शिगेला पोहचला आहा हे मात्र नक्की!