
Amitabh Bachchan यांच्या जंजीर चित्रपटाशी असलेलं धर्मेंद्रचं कनेक्शन!
मागच्या महिन्यात दिवंगत झालेले भारतीय सिनेमातील पोलादी पुरुष ही मॅन धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’ आणि राम बलराम या तीन चित्रपटात एकत्र काम केले. तीनही सिनेमे सुपरहिट झाले. पण तुम्हाला माहिती आहे का अमिताभ बच्चन यांचा स्टारडम ज्या चित्रपटापासून सुरू झाला तो प्रकाश मेहरा यांचा जंजीर चित्रपट खरंतर आधी धर्मेंद्रच करणार होता? सर्व काही फायनल झाले होते. धर्मेंद्र आणि मुमताज ही लीड पेअर ‘जंजीर’ चित्रपटात असणार होती. पण नंतर अशा काही घटना घडल्या की धर्मेंद्रने तो चित्रपट सोडला आणि अनेकांनी पुढे नकार दिल्यानंतर अमिताभ बच्चन यांना तो चित्रपट मिळाला आणि त्या चित्रपटापासून अमिताभचे युग सुरू झाले! नेमक्या काय घडामोडी त्या काळात घडल्या होत्या. खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे आणि मुख्य म्हणजे धर्मेंद्रने ‘जंजीर’ सिनेमा का सोडला याची देखील एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे.

१९७१ साली धर्मेंद्र यांना सलीम जावेद यांनी एक स्टोरी ऐकवली ती त्यांना प्रचंड आवडली आणि त्यांनी ती खरेदी केली. ही स्टोरी होती जंजीर या चित्रपटाची. धर्मेंद्र यांनी ही स्टोरी प्रकाश मेहरा यांना ऐकवली आणि त्यानं देखील ती खूप आवडली. आणि धर्मेंद्र यांनी प्रकाश मेहरा यांना सांगितले ,” या कथानकावरील चित्रपटात मी नक्की काम करेल तुम्ही दिग्दर्शन करा.” त्याच काळात पंडित मुखराम शर्मा यांच्या एका कथानकावर प्रकाश मेहरा चित्रपट तयार करण्याचा विचार करत होते ही स्टोरी देखील त्यांनी धर्मेंद्र यांना ऐकवली धर्मेंद्र यांना ती स्टोरी खूप आवडली आणि त्यांनी या चित्रपटात काम करण्यात इंटरेस्ट दाखवला. त्या बदल्यात त्यांनी आपली ‘जंजीर’ ची स्टोरी प्रकाश मेहरा यांना दिली.

दोघांमध्ये झालेल्या करारानुसार असे ठरले की ‘प्रकाश मेहरा आधी पंडित मुखराम शर्मा यांच्या कथानकावर ‘समाधी’ हा चित्रपट बनवतील ज्याचा नायक धर्मेंद्र असेल. आणि त्यानंतर प्रकाश मेहरा जंजीर हा चित्रपट बनवतील त्याचा नायक देखील धर्मेंद्रच असेल शिवाय धर्मेंद्र हा चित्रपट कोप्रोड्यूस देखील करेल.’ करारा प्रमाणे १९७२ साली ‘समाधी’ हा चित्रपट तयार झाला. यात धर्मेंद्रच्या नायिका आशा पारेख आणि जया भादुरी होत्या . हा चित्रपट हिट झाल्यानंतर प्रकाश मेहरा यांनी ‘जंजीर’ चित्रपटाची घोषणा केली. पण धर्मेंद्रकडे त्या वेळेला डेट्स खूप प्रॉब्लेम होता. कारण त्यांनी त्याच्या सर्व डेट्स नासिर हुसेन यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटासाठी दिल्या होत्या. प्रकाश मेहरा यांना जंजीर लवकर पूर्ण करायचा होता. आता पेच निर्माण झाला . मेहरा धर्मेंद्र मुळे अडकून पडले.

याच दरम्यान प्रकाश मेहरा यांना लेखक के ए नारायण यांनी एक कथानक ऐकवले ते देखील प्रकाश मेहरा यांना खूप आवडले त्यावर त्यांनी या कथेवर भविष्यात चित्रपट करायचे ठरवले. हे कथानक ‘कहानी किस्मत की’ या चित्रपटाचे होते. जेव्हा हे कथानक धर्मेंद्र यांनी ऐकले तेव्हा त्याने त्याचे मित्र आणि गुरु अर्जुन हिंगोरानी यांच्यासाठी ही कहाणी प्रकाश मेहरा कडून विकत घेतली. त्या बदल्यात ‘जंजीर’ हा चित्रपट मी करणार नाही असे देखील सांगितले. आता प्रकाश मेहरांच्या पुढे प्रश्न होता की आता ‘जंजीर’ नायक कोण? मग व्हाया राजकुमार, देव आनंद यांनी नकार दिल्यानंतर अभिनेता प्राण यांच्या सल्ल्या नंतर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री झाली!
================================
================================
‘जंजीर’ आणि ‘यादों की बारात’ हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी बनत होते दोन्ही चित्रपटाच्या कथानकात भरपूर साम्य होते. दोन्ही सिनेमे सलीम जावेद यांनी लिहिले होते. दोन्ही चित्रपटातील नायक रूढ अर्थाने नायक नव्हते त्यात त्यांना सिनेमात गाणी नव्हती. डान्स नव्हते. दोन्ही सिनेमात अजित चा सारखाच रोल होता . सिनेमाचे नायक अँग्री यंग मॅनचे कॅरेक्टर साकारत होते. त्यामुळे प्रकाश मेहरा यांना थोडीशी भीती वाटत होती. पण सलीम जावेद यांनी स्क्रीन प्ले लिहिताना पुरेशी काळजी घेतली होती. धर्मेंद्र नाही म्हटल्यानंतर मुमताजने देखील ‘जंजीर’ चित्रपटात काम करायला नकार दिला आणि तिथे जया भादूरी यांची वर्णी लागली. अशा प्रकारे यादों की बारात जंजीर हे दोन्ही सिनेमे एकाच वर्षी प्रदर्शित झाले आणि दोन्ही सुपरहिट ठरले. १९७४ साली अर्जुन हिंगोरानी यांचा कहाणी किस्मत की हा चित्रपट आला या सिनेमाला देखील चांगले यश मिळाले. जंजीर हा चित्रपट प्रकाश मेहरा यांच्या साठी खूप लकी ठरला कारण या चित्रपटापासूनच ते निर्माते बनले.