
Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा !
दक्षिण भारतीय अभिनेता धनुष (Dhanush) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. मनोरंजन विश्वात पसरलेल्या चर्चांनुसार, अभिनेता लवकरच आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करू शकतो. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येत आहे की धनुष पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे आणि हा सोहळा व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर होऊ शकतो. या चर्चांमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) चे नाव वारंवार पुढे येत आहे. हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली मृणाल आणि धनुष एकमेकांच्या संपर्कात असून ते डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत किंवा लग्नाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही.(Dhanush Second Marriage)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कथित विवाह सोहळा अत्यंत खाजगी स्वरूपाचा असू शकतो. जवळचे कुटुंबीय आणि निवडक मित्रमंडळी यांच्याच उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल, असेही बोलले जात आहे. या अफवांना अधिक हवा मिळण्यामागे काही सार्वजनिक कार्यक्रमांतील त्यांची उपस्थिती कारणीभूत ठरली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये मृणाल ठाकूरच्या एका चित्रपटाच्या प्रीमियरला धनुष उपस्थित होता. त्यानंतर धनुषच्या आगामी चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत मृणाल दिसल्याने दोघांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरली. याशिवाय, धनुषच्या कुटुंबीयांकडून मृणालला सोशल मीडियावर मिळणारा पाठिंबा देखील अनेकांच्या नजरेत भरला आहे.

एका मनोरंजन पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांना समजून घेत असून सध्या नात्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक घोषणांपासून अंतर राखले आहे. मित्रपरिवारात मात्र या नात्याबाबत सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले जाते. याआधी एका मुलाखतीत मृणालने धनुषसोबतच्या नात्याबाबत विचारले असता, आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचे स्पष्ट केले होते. धनुष ४२ वर्षांचा असून मृणाल ३३ वर्षांची आहे. वयातील अंतर असूनही दोघांमध्ये चांगली समज असल्याचेही बोलले जाते.(Dhanush Second Marriage)
==========================
==========================
धनुषच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने २००४ मध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी विवाह केला होता. या दांपत्याला दोन मुले आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर २०२२ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला आणि २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता धनुष आणि मृणाल यांच्या नात्याबाबत नेमके काय सत्य आहे, हे दोघांपैकी कोणी अधिकृतपणे बोलल्यानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत या सगळ्या चर्चा अफवांच्या पातळीवरच पाहिल्या जात आहेत.