Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’

सनी देओलऐवजी विरारच्या छोकऱ्याला मिळाली होती Gadar : Ek Prem

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’ खास क्षण झाला कॅमेरात कैद !

 Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’ खास क्षण झाला कॅमेरात कैद !
Bigg Boss Marathi 6Prajakta karan Romance
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’ खास क्षण झाला कॅमेरात कैद !

by Team KalakrutiMedia 13/02/2026

सततच्या वाद-विवादांमुळे चर्चेत राहिलेल्या Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वात आता एक वेगळीच हवा पाहायला मिळते आहे. आणि ती म्हणजे प्रेमाची. सुरुवातीला रुचिता-विशाल आणि नंतर करण-प्राजक्ताच्या जवळीकीची चर्चा रंगली होती. करणने आपल्या भावना प्राजक्तासमोर स्पष्ट केल्यानंतर ही केवळ अफवा नसून त्यांच्या नात्यात काहीतरी खास घडत असल्याचं आता घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही जाणवू लागलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात एक आगळावेगळा रंग पाहायला मिळाला. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याने फळांची भूमिका साकारली. प्राजक्ता (Prajakta Shukre) ‘स्ट्रॉबेरी’ तर करण (Karan Sonawane) ‘संत्रं’ बनला होता. प्रोमोमध्ये बिग बॉस स्ट्रॉबेरी बनलेल्या प्राजक्ताचं कौतुक करताना म्हणतात की ती खूप छान दिसते आहे. त्यावर प्राजक्ता गोड लाजते, हसत “थँक्यू” म्हणते. तिच्या मागे उभा असलेला करणही नकळत लाजताना दिसतो. हे पाहून बिग बॉस मिश्कीलपणे विचारतात, “स्ट्रॉबेरीचं कौतुक केल्यावर संत्रं का लाजलं?” आणि मग दोघांच्याही चेहऱ्यावर उमटलेलं हसू सगळंच सांगून जातं. (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Prajakta Karan romance

यानंतर फळांच्या बोर्डच्या आडून एकमेकांची छेड काढताना दिसलेले करण-प्राजक्ता प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले. हा केवळ खेळाचा भाग नाही, तर त्यांच्या नात्यातील गोडवा आहे, असं अनेक नेटकऱ्यांचं मत आहे. याआधी करणने प्राजक्तासमोर मन मोकळं केलं होतंच. घरातील इतर सदस्यांमधील चर्चांमुळे वातावरण तापलेलं असतानाही करणने स्पष्ट सांगितलं, “आमच्यामध्ये प्रेम असेल, मैत्री असेल, लग्न असेल, पण आम्ही Individual खेळतो.” राकेशने त्याला सल्ला देताना म्हटलं, “तू फक्त तिला जप. तिच्या भावनांना सांभाळ.” 

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Prajakta karan Romance

प्राजक्ताबद्दल बोलताना करण भावुक होत म्हणतो, “आयुष्यात मी कोणासोबत एवढं कनेक्ट नाही झालेलो. मला काळजी वाटायला लागली तुझी. असं कोणासोबत राहिलो नाहीये मी. मला इथं पहिल्यांदा फील झालं. आधी माझ्या आई-वडिलांना त्रास झाला की, मला त्रास होतो. एवढ्या वर्षात माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं झालं. एवढ्या वर्षांचा बंद रस्ता होता, तो आता सुरू झाला, म्हणून मी बोलायला टाळत होतो. मला इमोशनल नाही व्हायचंय, पण मला तो बांध नाही फोडायचा. आपण जेन्युईन असतो.” त्यावर प्राजक्ता शांतपणे म्हणते, “एवढा विचार नको करूस, मला माझं आयुष्य बिग बॉस नंतरचं पण महत्वाचं आहे. लोक लक्षात ठेवतात.”(Bigg Boss Marathi 6)

=============================

हे देखील वाचा: Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा ज्योतिर्लिंगे

=============================

घरातले समीकरणे बदलत असताना करण-प्राजक्ताची ही जोडी काहींना खूप आवडते आहे, तर काहींना ती फक्त गेम स्ट्रॅटेजी वाटते. पण एक गोष्ट मात्र नक्की. या नात्याने घरात एक वेगळाच गोडवा आणला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: BB Marathi 6 BBM6 romance bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi captaincy task Bigg Boss Marathi Latest Episode Bigg Boss Marathi love angle Bigg Boss Marathi News Bigg Boss Marathi Promo bigg boss marathi season 6 Bigg Boss Marathi Updates Celebrity Entertainment Karan confession Karan Prajakta Karan Prajakta love story Karan Prajakta romance marathi reality show Prajakta Bigg Boss
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.