Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

 Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!
कलाकृती विशेष

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

by दिलीप ठाकूर 14/02/2026

मी गिरगावातील गल्ली चित्रपट आणि एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीत लहानांपासून चित्रपट एन्जॉय करीत करीत आल्याने माझ्या मनात एका गोष्टीचे कायमच कुतुहल राहिले, ते म्हणजे चित्रपट बनतो कसा? चित्रपट स्टूडिओतील जग कसे आहे? पडद्यावरची माणसं प्रत्यक्षात दिसतात कशी? आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे १९८२ साली मिडियात मी आल्याबरोबर जाणून घ्यायला केलेली सुरुवात आजही कायम आहे, इतका आणि असा “आपला चित्रपट आणि त्याचे इनडोअर आणि आऊट डोअर लोकेशनचे जग” हा विषय खूपच मोठा आणि माहिती व मनोरंजनाने भरलेला असा आहे…. आणि याच खणखणीत आणि चौफेर वाटचालीत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, चित्रपट स्टूडिओतील माझी भटकंती. ग्रॅन्ड रोड येथील ज्योती स्टुडिओपासून दहिसर पूर्व येथील त्रिमूर्ती फिल्म स्टुडिओपर्यत हा बराच मोठा प्रवास आहे आणि त्यातीलच एक फिल्मालय स्टुडिओ.

अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथील हा चित्रपट स्टूडिओ आता केवळ एका कोपऱ्यापुरता शिल्लक असल्याचे दिसते. अन्यथा भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून फिल्मालय स्टुडिओ ओळखला जातो. प्रत्येक स्टुडिओचे व्यक्तीमत्व आणि वैशिष्ट्य वेगळे. आणि चेहरामोहराही वेगळा. जुन्या काळातील स्टुडिओना कदाचित बाह्य आकर्षण नसेलही. पण आत लागणारे प्रसंगानुरूप लहान मोठे सेट आणि मग लाईटस, कॅमेरा, ऍक्शन यांचा प्रवास वातावरण बदलून टाकणारा. रिटेकवर रिटेक आणि मग दिग्दर्शकाने ओके म्हणताच लाइट्स ऑफ होणे, लगोलग स्टील फोटोग्राफर पुढे सरसावणे हे सगळं प्रत्यक्षात लाईव्ह अनुभवणे ही गोष्टच वेगळी. सिनेपत्रकारीतेने मला ते दिले.

स्टूडिओत प्रवेश करताच उजव्या बाजूला गेल्यावर छानसे मिनी थिएटर होते.  अनेक चित्रपटांच्या ट्रायल मी तेथे अनुभवल्या. रानी मुखर्जीचा पहिला चित्रपट सलिम निर्मित ‘राजा की आयेगी बारात’चा ट्रायल शो आठवणीत राहणारा. आपला पहिलाच चित्रपट असल्याने रानी मुखर्जी आवर्जून उपस्थित असणे, आम्हा प्रत्येक चित्रपट समीक्षकाची भेट घेऊन आपल्या कामाबद्दल जाणून घेणे, आपण चित्रपट निर्माते राम मुखर्जी यांची मुलगी आहोत, काजोल आपली चुलत बहीण आहे हे तिने आवर्जून सागणे आणि एकूणच तिच्या बोलण्यात, वावरण्यात नवखेपण जाणवणे हे अगदी स्वाभाविक होतेच. ते सगळेच लक्षात राहीलेय. अनिल मट्टू दिग्दर्शित ’यशवंत’ या चित्रपटाच्या खेळाची विशेष आठवण म्हणजे या हिंदी चित्रपटात मकरंद अनासपुरेची छोटीशी भूमिका आहे. माझ्या लक्षात राहीली. या चित्रपटात नाना पाटेकर आणि मधु यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाना पाटेकरच्या प्रचंड डायलॉगबाजीने फिल्मालय स्टुडिओच्या मिनी थिएटरचा पडदाही हल्ल्यासारखा वाटला.

================================

हे देखील वाचा : NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….

================================

वर्षा उसगावकरची ग्लॅमरस भूमिका असलेला ‘शोहरत’ हा चित्रपटही येथेच पाहिला. या मिनी थिएटरबाहेर छोटीशी फिल्मी पार्टीदेखिल अधूनमधून आयोजित करण्यात येई. फिल्मालय स्टुडिओचा एकूणच परिसर ऐसपैस. चित्रीकरणासाठीचे मोठे फ्लोअर, आणि तरीही भरपूर मोकळी जागा आणि त्यात सेट लावायला असलेली मोठीच संधी. स्टूडिओत प्रवेश करताच समोर डाव्या बाजूला मेकअप रुम्स. जुन्या काळातील स्टुडिओतील मेकअप रुम्स दिसायला साध्या. पण आत शिरलेला कलाकार व्यक्तीरेखेनुसार तयार होवून बाहेर पडला की तेच मेकअप रुम काही वैगळेच वाटे.

फिल्मालय स्टुडिओत चित्रीकरण रिपोर्टिगसाठी आलेले योग माझ्या छान आठवणी आहेत. मेहुलकुमार दिग्दर्शित ‘क्रांतीवर’ या चित्रपटातील एका क्लबमधील नाना पाटेकर, बिंदू, अपूर्व अग्निहोत्री आणि ममता कुलकर्णी यांचे भन्नाट नृत्य असलेले कभी नंबर वन कभी नंबर टू हे नृत्य येथेच भला मोठा सेट लावून चित्रीत करण्यात आले. सेटवर नाना पाटेकरचे विशेषत्वाने जाणवणारे अस्तित्व हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होता. मोठा कलाकार हा पडद्यावर आणि पडद्याच्या मागे अर्थात सेटवर तसाच तेवढाच मोठा असतो.मेहुलकुमार हे आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर आम्हा चित्रपट पत्रकारांना आवर्जून बोलवतच. त्यामुळे असे अनुभव अनेक आले.

असाच एक निर्माता सुधाकर बोकाडे! तेही आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या मुहूर्ताला आणि चित्रीकरणाच्या वेळेस आम्हा चित्रपट पत्रकारांना आवर्जून बोलवत. त्यांनी निर्माण केलेल्या आणि नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार’ या चित्रपटाचा फिल्मालय स्टुडिओत दीड महिन्यांसाठी भला मोठा सेट लावला होता. नाना पाटेकर शिस्तबद्ध कलाकार व दिग्दर्शक. याचे भान ठेवून फिल्मालयला जाणं आवश्यक आहे याची जाणीव होतीच. डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, गौतम जोगळेकर यांच्यावर बरीच दृश्ये चित्रित करण्यात आली. नाना पाटेकरला प्रत्यक्षात दिग्दर्शन करताना पाहणे अथवा अनुभवणे हे सुधाकर बोकाडे यांच्यामुळे शक्य झाले. चित्रपटाच्या जगात कशाने काय साध्य होईल हे सांगता येत नाही ते हे असे. मी नाना पाटेकरला प्रत्यक्षात दिग्दर्शन करताना पाहिले हे त्या दिवसात‌ जवळपास भेटेल त्या प्रत्येकाला सांगत असे.  

फिल्मालय स्टुडिओत असाच एक अनेक दिवसांसाठी लागलेला सेट म्हणजे अशोक त्यागी दिग्दर्शित ‘रिटर्न्स ऑफ ज्वेल थीफ’ या चित्रपटाचा. हा रहस्यरंजक चित्रपट खरं तर विजय आनंद दिग्दर्शित ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटाचा सिक्वेल म्हणून निर्माण झाला. पण विजय आनंदला ही गोष्ट अजिबात न रुचल्याने त्याने मुहूर्ताला येणे टाळले आणि ही गोष्ट विशेष चर्चेची ठरली. या चित्रपटात मूळ चित्रपटातील अशोककुमार व देव आनंदसह धर्मेंद्र, जॅकी श्रॉफ, शिल्पा शिरोडकर, प्रेम चोप्रा आणि सदाशिव अमरापूरकर इत्यादींच्या प्रमुख भूमिका. आणि अनेकदा तरी एकाच वेळेस सेटवर यातील अनेक जण असत. मी स्वतः या चित्रपटाच्या सेटवर तीनदा गेलो. ते म्हणजे, सदाशिव अमरापूरकर, शिल्पा शिरोडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या एक्सलुझिव्ह मुलाखतीसाठी. प्रत्येक वेळी सेटवर अतिशय खेळकर वातावरण जाणवले.

मनोहर चव्हाण निर्मित आणि संजय सूरकर दिग्दर्शित ‘यज्ञ’ या मराठी चित्रपटाचेही चित्रीकरण येथे रंगले. जुन्या काळातील अनेक चित्रपटांच्या श्रेयनामावलीत फिल्मालय स्टुडिओ हे नाव हमखास वाचायला मिळते. फिल्मालय स्टुडिओचे आणखी एक वैशिष्ट्य, तेथे लॅन्डलाईन फोन केल्यावर कोणती चित्रीकरणे सुरु आहेत याची माहिती मिळत असे आणि आपल्याला बाहेर फोन करायचा असेल तर तो वापरता येत असे. त्या काळातील ते एक सामाजिक वैशिष्ट्य.

हा फिल्मालय स्टुडिओ १९५८/५९ साली उभा राहिला. त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, चित्रपट निर्माते सशधर मुखर्जी हे गोरेगाव येथील फिल्मीस्थान स्टुडिओतून बाहेर पडले आणि त्यांनी फिल्मालय स्टुडिओ उभारला. जालन कुटुंबियाकडे आता फिल्मीस्तान स्टुडिओची मालकी आली. फिल्मालय स्टुडिओचा पहिला चित्रपट होता, नासिर हुसैन दिग्दर्शित ‘दिल देके देखो’ (१९५९) हा पहिलाच चित्रपट सुपर डुपर हिट‌ ठरला आणि फिल्मालय निर्मित चित्रपटाची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर आर. के. नय्यर दिग्दर्शित ‘लव्ह इन सिमला’ (१९६०), राज खोसला दिग्दर्शित ‘एक मुसाफिर एक हसिना’ (१९६२), राम मुखर्जी दिग्दर्शित  ‘लीडर’ (१९६४), आर. के. नय्यर दिग्दर्शित ‘आओ प्यार करे’ (१९६४), रोनो मुखर्जी दिग्दर्शित ‘तू ही मेरी जिंदगी’ (१९६५), राम मुखर्जी दिग्दर्शित ‘एक बार मुस्कुरा दो’ (१९७२), शोमु मुखर्जी दिग्दर्शित ‘छैला बाबू’ (१९७७)वगैरे वगैरे अनेक चित्रपट.

================================

हे देखील वाचा : Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा क्लास कायम!

================================

सत्तरच्या दशकात मुखर्जी कुटुंबातील पुढील पिढीने स्टुडिओचा कारभार आणि चित्रपट निर्मिती यात पाऊल टाकले. आणि हीच वाटचाल पुढे सुरु राहिली. त्यानंतर तीच जबाबदारी त्याही नंतरच्या पिढीने घेतली. या वाटचालीत अनेक चित्रपटांचे मुहूर्त आणि चित्रीकरण येथे होत राहिले.‌ आजच्या डिजिटल पिढीच्या माहितीसाठी शोमु मुखर्जी हे काजोलचे तर राम मुखर्जी हे रानी मुखर्जीचे वडिल. फिल्मालय स्टुडिओची वाटचाल वैशिष्ट्यपूर्ण. आता मात्र त्याचा एक भाग तेवढा कार्यरत आहे.

मुंबईतील जुन्या काळातील चित्रपट स्टूडिओच्या जागेवर आज काय उभे राहिलेय हा एक वेगळाच फोकस ठरेल. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला चित्रपटातील व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पडद्यावर रंगवलेली दृश्ये आवडू लागली आहेत आणि त्यानुसार आता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त चित्रपट स्टूडिओ कार्यरत झाले आहेत…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Entertainment film studios filmalay studio mumbai
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.