
Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा
महाराष्ट्रात आपल्या दमदार नृत्यामुळे ओळख निर्माण केलेली गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्या प्रत्येक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडतेच; कधी तिच्या ठाम विधानांमुळे तर कधी तिच्या ठसकेबाज परफॉर्मन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओने मात्र चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. या व्हिडिओमध्ये गौतमी नववधूच्या वेशात दिसते. गृहप्रवेशाच्या क्षणी तिला उखाणा घेण्यास सांगितले जाते आणि ती लाजत म्हणते, “ना वायफाय ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट… ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट!” तिच्या या उखाण्यामुळे प्रेक्षक थोडेसे गोंधळले. कारण ज्याचं नाव ती घेते तो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता ओंकार राऊत (Onkar Raut) याच .(Gautami Patil Wedding)

व्हिडिओ व्हायरल होताच “दोघांनी खरंच लग्न केलं का?” असा प्रश्न चाहत्यांना पडला. काहींनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी शुभेच्छांचा वर्षावही केला. मात्र हा गोंधळ फार काळ टिकला नाही. गौतमीने स्वतः कमेंटद्वारे स्पष्ट केलं की हे प्रत्यक्ष लग्न नसून एका नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगचा भाग आहे. २०१७ साली प्रचंड लोकप्रिय ठरलेलं ‘गच्चीवरून कशी दिसते’ हे गाणं आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या रिमेकसाठी गौतमी पाटील आणि ओंकार राऊत यांची जोडी एकत्र झळकणार आहे. या म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठीच लग्नाच्या थीमवर आधारित हा मजेशीर व्हिडिओ तयार करण्यात आला होता. दोघेही कलाकार पहिल्यांदाच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.

ओंकार राऊतला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे मोठी लोकप्रियता मिळाली असली तरी त्याचा अभिनयप्रवास याआधीपासून सुरू आहे. ‘फ्रेशर्स’ आणि ‘फुलपाखरू’ मालिकांमधून त्याने छोट्या पडद्यावर छाप पाडली, तर ‘टाईमपास ३’सारख्या चित्रपटातही तो झळकला आहे. याशिवाय ‘काळे धंदे’ आणि ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या वेब सिरीजमधूनही त्याने वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.(Gautami Patil Wedding)
==================================
==================================
आता गौतमी पाटीलसोबतचा हा रोमँटिक म्युझिक व्हिडिओ त्याच्या करिअरमध्ये एक वेगळा रंग भरणार आहे, यात शंका नाही. चाहत्यांना या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.