Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

 Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!
मिक्स मसाला

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

by रसिका शिंदे-पॉल 18/02/2026

मराठी चित्रपटसृष्टीच्या एक काळ तमाशापटांना गाजवणारी ठसकेबाज लावणी आता बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ (Eetha) हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती त्या चित्रपटाचं पुण्यातील शुट नुकतंच संपलं असून सेटवरील टीमसोबत सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे.

लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangoankar) यांचा जीवनप्रवास ‘ईठा’ या चित्रपटातून आपल्यासोमर येणार असून यात विठाबाईंची भूमिका अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार आहे. या चित्रपटात विठाईंच्या भूमिकेसाठी तिची अचूक निवड केली असून आईचं मराठीपण तिच्यात प्रत्येकवेळी दिसत असतं. श्रद्धाचं मराठी भाषेवरील प्रेम बऱ्याचदा आपण पाहिलं आहेच. त्यामुळे आता या चित्रपटात तिचं मराठीपण आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असून ती या भूमिकेला कसा न्याय देणार हे पाहण्यासाठी तिचे चाहते उस्तुक आहेत. (Shraddha Kapoor)

तसेच, २०२५ मध्ये ‘छावा’ (Chhaava) सारखा ५०० कोटींचा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या लक्ष्मण यांचा ईठा हा चित्रपटदेखील ५०० कोटी पार करणार असा अंदाज आधीच व्यक्त केला जात आहे. ‘ईठा’ या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा (Randip Hudda) देखील प्रमुख भूमिकेत दिसणार असून अजून तो कोणती भूमिका साकारणार हे गुपित आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट यावा अशी प्रेक्षकांची मागमी आहे. (Laxman Utekar)

================================

हे देखील वाचा : Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?

================================

मिळालेल्या माहितनुसार, चित्रपटासाठी श्रद्धाने जोरदार तयारी केली आहे. तिने वजनही वाढवलं होतं. तसेच, श्रद्धाने लावणीचे धडे घेतल्याचं सांगितलं जात आहे. श्रदधाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर मोजक्या पण ठसठशीत अशा भूमिका साकारल्या आहेत. ‘आशिकी २’, ‘तीन पत्ती’, ‘एक व्हिलन, ‘हैदर’, ‘बागी’, ‘हसिना पारकर’, ‘स्त्री’, ‘स्त्री २’ अशा अनेक चित्रपटांत तिने उत्तम कामं केली आहेत. (Shraddha Kapoor Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chhaava eetha Entertainment News Laxman Utekar randip hudda shraddha kapoor shraddha kapoor movies vithabai narayangoankar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.