
Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण; प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील सदस्यांना भोवणार?
बिग बॉस मराठी ६ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये घरातील सदस्यांना जेवण मिळत नाही, आणि यामागचं कारण घरातील एका सदस्याचा चुकीचा निर्णय असल्याचं दिसत आहे. प्रोमोमध्ये स्पष्ट दिसतं की प्राजक्ता (Prajakta Shukre) आणि अनुश्री माने (Anushree Mane) यांच्यात घरकाम आणि जेवणावरून वाद सुरू झाला आहे. किचनजवळ प्राजक्ता सोफ्यावर बसलेली दिसते, तर डायनिंग टेबलवर अनुश्री आणि रुचिता बसलेल्या आहेत. अनुश्री प्राजक्ताला बोलते तुमच्यामुळे जेवण थांबलाय ना सगळ्यांचं. आपण आपली ड्युटी करायची आणि त्यांनी त्यांची जेवणाची ड्युटी करायची नाही. मी माझी ड्युटी करून आले आहे, मला जेवण मिळायलाच पाहिजे. करून घ्या ना ते. तिथल्या तिथं कचरा आहे. यावर प्राजक्ता म्हणते मी नाही झुकणार आहे.यावर प्राजक्ता ठामपणे उत्तर देते की ती कचऱ्याबाबत झुकणार नाही आणि आपला निर्णय कायम ठेवते.(Bigg Boss Marathi 6)

अनुश्री आणि प्राजक्ताच्या बोलण्यावरून हा वाद कचरा आणि जेवण यावरून झाला आहे. याआधीच्या प्रोमोमध्ये राखी आणि प्राजक्तामधील वाद ही दिसला होता. राखी प्राजक्ताला कचरा काढायला सांगते, मात्र प्राजक्ता म्हणते की अंघोळीनंतर तिला कचरा काढता येणार नाही. या उत्तरावर राखी खूपच भडकते आणि म्हणते की बिग बॉसने जे काम सांगितलं आहे, ते ती करणार आहे, पण इतर लोक तिला सिरीयसली घेत नाहीत. ”बिग बॉसने मला काम सांगितलं आहे, ते मी करणाच. हे लोक मला सीरिअसली घेत नाहीत. जे होणार ते मी आता बघून घेणार. मी आता कुणालाही रिक्वेस्ट करणार नाही.” अस ही राखी म्हणते.

यामुळे प्राजक्ताच्या निर्णयामुळे घरातील प्रत्येकाच्या जेवणावर परिणाम झाला आणि राखीने सगळ्यांचं जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला. एकाच सदस्याच्या चुकीची शिक्षा आता संपूर्ण घराला भोगावी लागते हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. प्रेक्षक आता उत्सुक आहेत की प्राजक्ताचा हा अडमुठेपणा घरातील इतर सदस्यांना कितपत भोवणार आणि घरात नवा ड्रामा कोणत्या प्रकारे निर्माण होणार.(Bigg Boss Marathi 6)
===========================
===========================
जेवण बंद झाल्यानंतर घरातील वातावरण कसं असेल आणि पुढच्या भागात कोणते सीन पाहायला मिळतील, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. बिग बॉस मराठी ६ चा पुढचा भाग पूर्णत: तणाव, ड्रामा आणि रोमांचाने भरलेला असण्याची शक्यता आहे.