मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने

मालिका विश्वातली प्रेक्षकांची आवडती गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट…
मराठी टेलिव्हिजन विश्वात काही जोड्या अशा असतात की त्या प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून जातात. स्टार प्रवाहवरील मालिकांमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अशीच एक जोडी म्हणजे मंदार जाधव (Mandar Jadhav) आणि गिरिजा प्रभु (Girija Prabhu). आता ही लोकप्रिय जोडी तिसऱ्यांदा एकत्र झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. (Mandar Jadhav and Girija Prabhu Together)

२०२० साली सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि जयदीप-गौरी या व्यक्तिरेखांनी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. मंदारने साकारलेला जयदीप आणि गिरीजाने साकारलेली गौरी ही जोडी घराघरात पोहोचली. तब्बल चार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि टीआरपीमध्येही आपली छाप सोडली.

या यशानंतर दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली ती कोण होतीस तू काय झालीस तू? (Kon Hotis Tu Kay Zalis Tu) या मालिकेतून. या वेळी त्यांनी यश आणि कावेरी या भूमिका साकारल्या. मात्र या मालिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही आणि काही महिन्यांतच ती मालिका संपुष्टात आली.दरम्यान, मंदार जाधवने सोशल मीडियावर गिरीजासोबतचा एक फोटो शेअर करत “पुन्हा एकदा लवकरच…” असे सूचक कॅप्शन दिले. या एका वाक्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघे पुन्हा कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून एकत्र दिसणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.(Mandar Jadhav and Girija Prabhu Together)
=================================
हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब…
=================================
प्रेक्षकांकडून या जोडीला नेहमीच भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा एकत्र येताना त्यांची नवी भूमिका आणि कथानक काय असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता ही जोडी कोणत्या नव्या मालिकेत किंवा कलाकृतीतून प्रेक्षकांसमोर येणार, हे लवकरच स्पष्ट होईल.