Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Chhaava छावामधला ‘तो’ सीन शूट करताना घडला मोठा योगायोग; दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी सांगितला किस्सा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आपल्या खंबीर खांद्यांवर घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याला खऱ्या अर्थाने सांभाळले. आपल्या केवळ ९ वर्षाच्या स्वराज्याच्या काळात अनेक मोठे पराक्रम केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या अतिशय छोट्या कारकिर्दीमध्ये अनेक अशक्य आणि मोठे पराक्रम करत महाराजांचा वारसा यशस्वीरित्या पुढे नेला. (Chhaava)
दुर्दैवाने आपलाच माणूस फितूर झाला, आणि छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले. क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल केले आणि त्यांची हत्या केली. स्वराज्याचा ‘छावा’ अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक मोठ्या लढाया जिंकल्या. विपुल लिखाण केले. त्यांचे अनन्यसाधारण कर्तृत्व संपूर्ण जगाला कळावे या उद्देशाने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा‘ (Chhaava) हा सिनेमा तयार केला आहे. (Entertainment mix masala)

प्रतिभावान अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सिनेमात साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा अतिशय भव्य असा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाची जोरदार हवा पाहायला मिळत असून, सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. अशाच एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमाच्या खास सीनच्या शूटिंगचा एक योगायोग सांगितला आहे. (Bollywood Masala)
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाबद्दल तर सर्वानाच माहित आहे. आम्ही देखील सिनेमासाठी अगदी तसेच अष्टमुखी सिंहासन तयार केले. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सीन शूट करत होतो. माझे आणि राजे (विकी कौशल) आमचे ट्युनिंग चांगले असल्याने आमचा प्रत्येक सीन केवळ २/३ टेकमधेच ओके होतो. मात्र यातला एक असा सीन होता ज्याला आम्हाला २/३ नव्हे तर तब्बल १५ टेक घ्यावे लागले.
सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज चालत येतात आणि सिंहासनाकडे बघताच त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द आठवतात… ‘शंभू हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे’ … महाराजांचे हेच शब्द ऐकत छत्रपती संभाजी राजे सिंहासनाकडे जातात. मात्र या सीनच्या वेळी जेव्हा जेव्हा राजे (विकी) सिंहासनाकडे चालत येत होते तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. सेटवर जवळपास ७०० माणसं होती. आता राजा दरबारात रडू शकत नाही त्यामुळे आम्हाला तो सीन पुनः पुन्हा शूट करावा लागात होता. मी राजेंना सांगितले की डोळ्यात अश्रू आणू नका.
======
हे देखील वाचा : Urmila Matondkar ९० चे दशक गाजवणारी ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर
======
मात्र केवळ राजेच नाही तर सेटवर उपस्थित असलेले सर्वच माणसं त्यादिवशी खूपच भावुक झाले होते. मुख्य म्हणजे त्या दिवशी एक मोठा योगायोग जुळून आला. तो म्हणजे ज्या दिवशी आम्ही राज्याभिषेकाचा सीन शूट केला त्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा देखील राज्याभिषेक झाला होता.”
छावा या सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास येत्या १४ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात विकी कौशल सोबत रश्मिका मंदाना ही सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसेल. रश्मिका या सिनेमा महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. २ तास ४१ मिनिटं प्रेक्षकांना हा छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.