ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
राज कपूरच्या लग्नाची भन्नाट रोमँटिक लव्ह स्टोरी
हिंदी सिनेमाचा पहिला शो मन राजकपूर, यांची जन्मशताब्दी लवकरच सुरू होत आहे. भारतीय सिनेमामध्ये राज कपूरचे (Raj Kapoor) योगदान खूप मोठे आहे. इथल्या सामान्य भोळ्या, भाबड्या लोकांच्या सुख दुःखाला त्याने रुपेरी पडद्यावर आणले. राज कपूरचा चेहरा म्हणजे इथल्या सामान्य भारतीयाचा चेहरा. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील लवकरच या प्रतिमेचे स्वतःशी कोरिलेट केले आणि राज कपूरच्या चित्रपटांनी देशातच नव्हे तर संपूर्ण दुनियेत आपल्या कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटवला. आज राज कपूरच्या (Raj Kapoor) लग्नाची एक अनटोल्ड स्टोरी मी आपल्यासोबत शेअर करत आहे. राजकपूर त्यावेळी आपले वडील पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये प्रोडक्शन इन्चार्ज म्हणून काम करत होता. त्याच बरोबर छोटी-मोठी नाटकातील भूमिका देखील करत होता. संगीताची त्याला पहिल्या पासूनच खूप आवड होती त्यामुळे तो तबला देखील त्या काळात शिकत होता. ज्या काळात आपल्या मुलांना कोणीही नाटक सिनेमांमध्ये जा असं सांगत नव्हते अशा काळात पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या मुलांना मात्र “याच लाईनमध्ये आपलं करिअर करा!” असं सांगितलं होतं. त्यामुळे राज कपूरसाठी सिनेमा हे माध्यम सुरुवातीपासूनच आवडतं झालं होतं. अभिनेता प्रेमनाथ हा राज कपूरचा (Raj Kapoor) मित्र आणि दूरचा नातेवाईक. हे दोघेही पेशावरला एकत्र होते. नंतर प्रेमनाथचे कुटुंब मध्य प्रदेश मधील जबलपूर जवळच्या दिना येथे स्थलांतरित झाले. प्रेमनाथला देखील चित्रपटांमध्ये काम करायचे होते परंतु त्याच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. त्याने एकदा राज कपूरला सांगितले,” तू माझ्या वडिलांना येऊन भेट आणि माझ्यासाठी सिनेमात काम करण्याची परवानगी मिळवून दे.”
राज कपूरवर (Raj Kapoor) सोपवलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी तो मध्यप्रदेशातील दिना येथे त्यांना भेटायला गेला. ज्या कामासाठी तो गेला ते काम तर झालं पण त्यासोबतच त्याला त्याच्या आयुष्यातील लाईफ पार्टनर देखील या भेटीत मिळाली. हा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे राज कपूर (Raj Kapoor) तेव्हा २१-२२ वर्षाचा होता. तो प्रेमनाथ घरी त्याच्या वडिलांशी बोलत असताना त्याला सतारीची सूर ऐकू आले. राजकपूरला संगीताचे पहिल्या पासून आवड. त्यामुळे त्या सतारीच्या सुरांनी तो भारावला. ही सतार कोण वाजवत आहे याचा त्याला प्रश्न पडला. वडिलांशी जुजबी बोलणं झाल्यानंतर त्याने प्रेमनाथला विचारलं ,”घरात सतार कोण वाजवत आहे?” तेव्हा त्याने सांगितले,” माझी बहीण कृष्णा सतार वाजवत आहे.” राज कपूरने विचारलं,” मी आत जाऊन तिला भेटू कां?” प्रेमनाथच्या वडिलांनी होकार दिला. मग राजकपूर आत गेला. तर एक सोळा वर्षाची मुलगी अतिशय सुंदर सतार वाजवत होते. राज कपूर तिचे सतारीचे वादन आणि तिला पाहून मंत्रमुग्ध झाला. त्याने विचारले,” तुझ्या सतार वादनाला मी माझ्या तबला वादनाची साथ करू का?” तिने लाजून त्याला होकार दिला. राजकपूर ने लगेच तबल्यावर तिला साथ द्यायला सुरुवात केली. सतार आणि तबला ही जुगलबंदी मस्त रंगली. त्यावेळी त्या दोघांनाही कुठे ठाऊक होते ही त्यांची साथ पुढे आयुष्यभराची साथ होणार आहे. नंतर राज कपूर (Raj Kapoor) मुंबईला निघून गेला पण प्रवासात तो सदैव कृष्णाचाच विचार करत होता. त्याच्या डोळ्यासमोरून तिचा चेहरा हलायला तयार नव्हता. इकडे कृष्णाची देखील तीच अवस्था होती. तिला मनोमन राजकपूर (Raj Kapoor) आवडला होता. ‘आग दोनो तरफ से बराबर लगी हुई थी‘ मुंबईला पोहोचेपर्यंत राजकपूरने करायचे लग्नात हिच्याशीच. असा इरादा पक्का त्याने केला.
======
हे देखील वाचा : ‘के’ पासून का असतात राकेश रोशन यांच्या सिनेमांची नाव
======
मुंबईला घरी गेल्यानंतर राज कपूरने (Raj Kapoor) आपल्या वडिलांना कृष्णाबद्दल सांगितले आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे असा निर्णय देखील सांगितला. पृथ्वीराज कपूर लगेच पुढच्याच आठवड्यात मध्य प्रदेश मधील दिना येथे पोहोचले. मग रीतसर दोन्ही कुटुंबांची बोलणी झाली आणि पुढे काही दिवसातच म्हणजे १२ मे १९४६ रोजी राज कपूर आणि कृष्णा मल्होत्रा यांचे लग्न झाले. या लग्नाची लग्नपत्रिका त्याकाळी खूप गाजली होती. कृष्णा कपूर लग्नाच्या वेळी अवघ्या सोळा वर्षाची होती आणि राजकपूर २२ वर्षांचा! राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्यामध्ये बाप लेकां पेक्षाही मैत्रीचं नातं अधिक होतं. या लग्नामध्ये त्यांनी राज कपूर आणि कृष्णा कपूर यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ हा काव्यसंग्रह भेट म्हणून दिला. दोघांनाही भेट खूपच आवडली!